या कारणाने बोनी कपूरच्या पहिल्या पत्नीच्या अंत्यसंस्काराला गेली नव्हती श्रीदेवी!

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूमुळे तिचे चाहते दु:खात आहेत. श्रीदेवीच्या निधनामुळे ६ वर्षांपूर्वीच्या त्या घटनेला ताजं केलं.

Updated: Feb 27, 2018, 08:35 PM IST
या कारणाने बोनी कपूरच्या पहिल्या पत्नीच्या अंत्यसंस्काराला गेली नव्हती श्रीदेवी!  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूमुळे तिचे चाहते दु:खात आहेत. श्रीदेवीच्या निधनामुळे ६ वर्षांपूर्वीच्या त्या घटनेला ताजं केलं, जेव्हा बोनी कपूरची पहिली पत्नी आणि अर्जुन कपूरची आई मोना कपूरचं निधन झालं होतं. मोना यांच्या पार्थिवाला खांदा देण्यासाठी बोनी कपूर तर गेले होते, पण श्रीदेवी आणि तिच्या दोन मुली गेल्या नव्हत्या.  

बोनीच्या पहिल्या पत्नीचा मॄत्यू

६ वर्षांआधी २०१२ मध्ये कॅन्सर या आजाराने बोनी कपूरची पहिली पत्नी मोना कपूर या जगातून गेली होती. मोना यांच्या अंतिम यात्रेत बॉलिवूडमधील अनेक कलाकार मंडळी आले होते. श्रीदेवी तिथे न येणं तसं आश्चर्याचं नव्हतं. कारण बोनीचा मुलगी अर्जुन कपूर आणि मुलगी अनुशा कपूर श्रीदेवीला पसंत करत नव्हते. 

अर्जुन काय म्हणाला होता?

अर्जुन कपूरने तर एका मुलाखतीत म्हटले होते की, श्रीदेवी माझी आई नाहीये. ती केवळ माझ्या वडिलांची पत्नी आहे. जान्हवी आणि खुशीबाबत अर्जुन म्हणाला होता की, त्या माझ्या बहिणी नाहीत.

का गेली नव्हती श्रीदेवी?

श्रीदेवीला हे माहिती होतं की, अर्जुन आणि अनुशा हे दोघेही तिच्यावर नाराज आहेत. त्यामुळे तेथे जाऊन त्या दोघांना दु:खी करण्यापेक्षा न जाणे श्रीदेवीने योग्य समजले होते. कारण त्यावेळी कपूर परीवारातील अनेकांनी श्रीदेवीचा पूर्णपणे स्विकार केला नव्हता. 

श्रीदेवीच्या मृत्यूवेळी अर्जुन कुठे होता?

अर्जुन हा पंजाबमध्ये शूटिंग करत होता. त्याला बातमी मिळताच तो शूटिंग सोडून थेट मुंबईला आला. आणि तो अनिल कपूर यांच्या घरी गेला. त्यानंतर तो वडील बोनी कपूर यांना आधार देण्यासाठी दुबईलाही गेला होता.