समर स्पेशल : शीतलीने दिल्यात खास टिप्स

Updated: May 29, 2018, 03:29 PM IST

मुंबई : मालिका विश्वातील नेहमीच चर्चेत राहणारा चेहरा म्हणजे लागिरं झालं जी फेम शिवानी बावकर अर्थात तुमची आमची शीतली. सध्या उकाडा प्रचंड वाढलाय. उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे उन्हाने होणारे त्रासही वाढतायत. उन्हामुळे होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी शिवानी बावकरने तिच्या फॅन्सना खास टिप्स दिल्यात.

जाणून घ्या या टिप्स

१. उन्हाळ्याच्या दिवसांत घरगुती सरबतानां अधिक महत्त्व द्या. थंड पेय प्या. तिखट पदार्थ खाणे टाळा.

२.  भरपूर पाणी प्या. बाहेर जात असाल तर डोक्याला रुमाल बांधा. भरपूर ताक प्या. तिखट खाणे टाळा. सनस्क्रीनचा वापर जरुर करा.

३. स्कार्फचा वापर करा. केसांची काळजी घ्या. तेलाने केसांना मसाज करा. नियमितपणे तेलाने केसांना मसाज करा. ग्लुकोन्डी, इलेक्ट्रॉल पावडर जरुर स्वत:कडे बाळगा.