18 वर्षं लहान असलेल्या एक्स बॉयफ्रेंडसोबत सुष्मिता सेननं केला पॅचअप! VIDEO मुळे एकच चर्चा

Sushmita Sen and Rohman Shawl Relationship : सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल हे पुन्हा एकदा एकत्र दिसल्यानं चाहत्यांमध्ये ते दोघं एकत्र आल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

दिक्षा पाटील | Updated: Nov 8, 2023, 06:09 PM IST
18 वर्षं लहान असलेल्या एक्स बॉयफ्रेंडसोबत सुष्मिता सेननं केला पॅचअप! VIDEO मुळे एकच चर्चा title=
(Photo Credit : Social Media)

Sushmita Sen and Rohman Shawl Relationship : विश्वसुंदरी सुष्मिता सेन नेहमीच वेगवेगळ्या कारणांवरुन चर्चेत असते. आता ती चर्चेत येण्याचं कारण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या तिचा एका व्हिडीओ. कारण या व्हिडीओत सुष्मितासोबत तिचा एक्स बॅायफ्रेंड रोहमन शॉल दिसला आहे. खरंतर, काही दिवसांपूर्वीच त्यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्या व्हिडीओत 'आर्या 3'च्या प्रमोशन मध्ये व्यस्त असलेल्या सुष्मितासोबत आपल्याला रोहमन दिसला होता. त्यानंतर आता लगेच ते दोघं पुन्हा एकदा एकत्र दिसल्यानं सुष्मिताच्या चाहत्यांमध्ये चर्चा रंगू लागली आहे. 

सुष्मिताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो विरल भयानी या सेलिब्रिटी फोटोग्राफरनं शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला ते दोघं एकमेकांच्या हातातहात धरून येत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर त्यांनी पापाराझींना फोटोसाठी पोझ दिल्या आहेत. यावेळी सुष्मितानं काळ्या रंगाची साडी नेसली आहे, तर दुसरीकडे रोहमननं पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि त्यासोबत त्यांनं ऑलिव्ह ग्रीन रंगाचं जॅकेट परिधान केलं आहे. इतकंच नाही तर रोहमन तिचा पदर सावरत असल्याचे देखील आपल्याला दिसत आहे. हे दोघं दिवाळी पार्टीसाठी एकत्र गेले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कधी झाला होता ब्रेकअप?

डिसेंबर 2021 मध्ये सुष्मिता सेन आणि रोहमन यांचा ब्रेकअप झाला होता. मात्र, विभक्त झाल्यानंतर देखील ते मित्र म्हणून अनेकदा एकत्र दिसले आहेत. ब्रेकअपच्या दोन वर्षांनंतर ते पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. या व्हिडीओमधील त्यांची केमिस्ट्री पाहिल्यानंतर सुष्मिताच्या चाहत्यांना आशा आहे की त्यांचा पॅचअप झाला. रोहमनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुष्मिता ही आयपीएलचे संस्थापक आणि बिझनेसमॅन ललित मोदी यांना डेट करत होती. ललीत मोदी हे सुष्मिता पेक्षा वयानं 10 वर्षांनी मोठे होते. तर त्याआधी ती वयानं 18 वर्षे लहान असलेल्या रोहमनला डेट करत होती. आता पुन्हा एकदा ते रिलेशनशिपमध्ये आले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : मनीष मल्होत्राच्या पार्टीत सलमान आणि ऐश्वर्याची गळाभेट? Photo Viral

'ताली' या चित्रपटाच्या यशानंतर सुष्मिताच्या ‘आर्या’ या सीरजता सीझन 3 प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सुष्मिता आपल्या सौंदर्या बरोबर अभिनयाने देखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. सुष्मिता सेन आणि रोहमन हे दोघं 2018 पासून रिलेशनशिपमध्ये होते. त्याचवर्षी रोहमननं तिला इन्स्टाग्रामवर मेसेज केला होता. तेव्हा त्यांची ओळख झाली आणि ते रिलेशनशिपमध्ये आले.