मनीष मल्होत्राच्या पार्टीत सलमान आणि ऐश्वर्याची गळाभेट? Photo Viral

Salman Khan and Aishwarya rai : सलमान खान आणि ऐश्वर्यानं मिठी मारल्याची चर्चा सुरु झाली आहे. ते दोघे मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत एकत्र दिसले होते, त्यात पार्टीतीलीच एक फोटो समोर आल्यानंतर या चर्चा रंगल्या आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: Nov 8, 2023, 11:31 AM IST
मनीष मल्होत्राच्या पार्टीत सलमान आणि ऐश्वर्याची गळाभेट? Photo Viral title=
(Photo Credit : Social Media)

Salman Khan and Aishwarya rai : बॉलिवूड दिवाळी सेलिब्रेशनविषयी सगळ्यांनाच माहित आहे. सध्या रोज आपण पाहोतय की कोण ना कोण दिवाळी आधी पार्टी देत आहे. अशीच एक पार्टी नुकतीच मनीष मल्होत्राच्या घरी देखील होती. यावेळी अनेक कपल दिसले. त्यातही एक्स कपल्समध्ये सगळ्यांचं लक्ष हे अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या रायनं वेधले. ते दोघे देखील या पार्टीत एकत्र दिसले होते. त्यांचे सोशल मीडियावर अनेक फोटो समोर आले होते. या फोटोंना पाहून म्हटले जात आहे की सलमान आणि ऐश्वर्या या पार्टीत एकमेकांना मिठी मारताना दिसले. त्यावर आता प्रेक्षकांची प्रतिक्रिया समोर येत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून मनीष मल्होत्रानं चित्रपटसृष्टीतील कलाकारांसाठी प्री दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आली. या पार्टीत सलमान खान, ऐश्वर्या राय, रेखा, गौरी खान, सुहाना, खुशी कपूर, अनन्या पांडे आणि वरुण धवन यासोबत अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. खरंतर सलमानच्या एन्ट्रीनं सगळ्यांचे लक्ष वेधले होते. काही रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे की जेव्हा सलमान या पार्टीत आला त्यानंतर लगेच ऐश्वर्या राय या पार्टीतून बाहेर पडली. आता जो फोटो समोर आला आहे, त्यात म्हटले जात आहे की पार्टीत सलमान खान आणि ऐश्वर्या यांनी एकमेकांना मिठी मारली आहे.

Salman Khan and Aishwarya rai Hug At Manish Malhotra Diwali Party

या फोटोत एक मुलगी आहे जिनं गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे आणि त्या मुलीनं सलमान खानला मिठी मारताना दिसते. पण तिचा चेहरा दिसत नाही आहे. ते दोघं मनीष मल्होत्राच्या घराच्या गेटवर दिसला. या फोटोतून एक गोष्ट समोर आली आहे की यात सलमान दिसत आहे. मात्र, मुलीचा चेहरा दिसत नाही आहे. फक्त कपडे दिसत आहेत. त्यामुळे ती ऐश्वर्या आहे असं म्हणता येणार नाही. 

Salman Khan and Aishwarya rai Hug At Manish Malhotra Diwali Party

हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर करत अनेकांनी प्रश्न विचारला आहे की हा सलमान आणि ऐश्वर्या आहेत? सध्या सोशल मीडियावर हा फोटो पाहून नेटकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यावर ते विविध कमेंट करताना दिसत आहे. काही नेटकऱ्यांनी तर लगेच संजय लीला भन्साळी यांच्याकडे 'हम दिल दे चुके सनम 2' करण्याची विनंती केली आहे. खरं हा फोटो पाहिल्यानंतर नेटकरी यामागे सत्य काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, असं म्हटलं जात आहे की या फोटोत दिसणारी मुलगी ही ऐश्वर्या राय नाही तर सूजर पंचोली यांची बहीण सना पंचोली आहे. या पार्टीत ती देखील उपस्थित होती. 

हेही वाचा : मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत दिसले ऐश्वर्या आणि सलमान खान

सलमान खान या दिवाळीच्या निमित्तानं त्याच्या चाहत्यांना भेट देत आहे. ती भेट ही तो 'टायगर 3' च्या माध्यमातून देत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत झोया या भूमिकेत कतरिना कैफ दिसणार आहे. या चित्रपटात अनेक अॅक्शन सीन्स आहेत. तर 'टाइगर 3' मध्ये इमरान हाश्मी हा खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे.