स्वानंदीच्या हाती साखरपुड्याची मेहंदी; होणाऱ्या पतीसोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत म्हणाली...

Swanandi Tikekar and Ashish Kulkarni Engagement : स्वानंदी टिकेकरनं 20 जुलै रोजी तिच्या रिलेशनशिपविषयी सांगितले तर आता तिनं तिच्या साखरपुड्याच्या मेहंदीचा फोटो शेअर केला आहे. आशिषसोबतचा हा रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 24, 2023, 02:24 PM IST
स्वानंदीच्या हाती साखरपुड्याची मेहंदी; होणाऱ्या पतीसोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत म्हणाली... title=
(Photo Credit : Swanandi Tikekar Instagram)

Swanandi Tikekar and Ashish Kulkarni Engagement : काही दिवसांपूर्वी 'सारेगमपमधील लिटिल चॅप्म्स'च्या प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी त्यांच्या रिलेशनशिपविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जगजाहिरपणे सांगितले. त्यानंतर त्यांच्या सगळ्या चाहत्यांना आनंद झाला. त्यांच्या केळवणाचा कार्यक्रम देखील सुरु झाला आहे. अशात आता अभिनेत्री, गायिका स्वानंदी टिकेकरनं काही दिवसांपूर्वीच तिच्या आणि गायक आशिष कुलकर्णीच्या रिलेशनशिपविषयी सांगितलं. स्वानंदी आणि आशिष यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली होती. आता स्वानंदीनं तिच्या साखरपुड्याची आणि मेहंदीची तयारी सुरु झाल्याची माहिती दिली आहे. तिनं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

स्वानंदीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आशिष कुलकर्णीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत स्वानंदीच्या हातावर मेहंदी असल्याचे दिसत आहे. त्याफोटोत आशिष तिला गालावर किस करताना दिसत आहे. तर स्वानंदीनं ट्रेडिशन्ल लेहेंगदा परिधान केला आहे. त्यांचा हा फोटो शेअर करत स्वानंदीनं कॅप्शन दिलं आहे की "आम्हाला जे हवं होतं तेच...". याशिवाय स्वानंदीनं यावसोबत #EngagementMehendi #SwanandiAshish हे हॅशटॅग देखील वापरले आहेत. तर स्वानंदीच्या हाताच्या मागे बाजूला तिचं आणि आशिषच्या नावातील इंग्रजीत असलेलं पहिलं इनिशिअल काढलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

स्वानंदीने 20 जुलै रोजी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या रिलेशनशिपची घोषणा केली होती. तर स्वानंदी ही ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर यांची लेक आहे. त्यापोस्टमध्ये स्वानंदीनं आशिषसोबतचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत This is US असं कॅप्शन तिनं दिलं होतं. यासोबतच खाली #love #amachatharlay असे हॅशटॅग्स दिले आहेत. तेव्हा पासून त्या दोघांचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : सिनेजगतातून ब्रेक घेतल्यामुळं Samantha Ruth Prabhu नं गमावले 'इतके' कोटी रुपये

स्वानंदी आणि आशिष विषयी बोलायचं झालं तर स्वानंदीनं 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिनं 'अस्सं माहेर नको गं बाई', 'सुंदरा मनामध्ये भरली', 'अगं अगं सुनबाई, काय म्हणता सासूबाई' या मालिकांमध्ये काम केलं. स्वानंदी एक गायिका असून ती 'सिंगिंग स्टार' या कार्यक्रमाची विजेती देखील आहे. आता आशिष विषयी बोलायचे झाले तर 2008 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून तो प्रकाशझोतात आला होता. त्यानंतर आशिष हा 'इंडियन आयडॉल 12' मध्ये देखील दिसला होता. त्याचा ‘रॅगलॉजिक’ नावाचा म्युझिक ब्रॅंड आहे. तर त्यानं आजवर अनेक मराठी चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत.