तैमूरची एअरपोर्टवरिल मस्ती कॅमेऱ्यात कैद...

करिना कपूर खान आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेत असतो.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 16, 2017, 04:42 PM IST
तैमूरची एअरपोर्टवरिल मस्ती कॅमेऱ्यात कैद... title=

नवी दिल्ली : करिना कपूर खान आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेत असतो.

तैमूरचा पहिला बर्थडे 

२० डिसेंबरला त्याचा पहिला वाढदिवस आहे. तो साजरा करण्यासाठी करिना आणि सैफ अली खान पटोदीला रवाना झाले. करिना आपल्या लाडल्याचा पहिला बर्थडे पटोडी महलमध्ये साजरा करणार आहे. 

क्‍यूट लिटिल बॉय

त्यासाठी रवाना होत असताना एअरपोर्टवर तैमूरची भेट बॉलिवूडची बबली गर्ल जॅकलिनसोबत झाली. गोंडस तैमूरला बघून जॅकलिन देखील थांबली आणि तिने या 'क्‍यूट लिटिल बॉय'चा व्हिडिओ बनवला. तिने हा व्हिडिओ इंस्‍टाग्रामवर शेअर केला आहे. 
व्हिडिओत तैमूर आयाच्या हातात आहे. त्याच्या हातात एक सिपर आहे. त्याच्याशी खेळणारा तैमूर खूप क्‍यूट दिसत आहे. 

बर्थडे सेलीब्रेशन

तैमूरचा पहिला वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने करण्याचे करिना आणि सैफने ठरवले आहे. या सेलीब्रेशनमध्ये त्यांचे कुटुंबिय आणि जवळचा मित्र परिवार सहभागी होणार आहे.