अक्षय कुमारकडून पोलिसाचं भरभरून कौतुक : व्हिडिओ

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 

Updated: Jun 23, 2020, 05:35 PM IST
अक्षय कुमारकडून पोलिसाचं भरभरून कौतुक : व्हिडिओ  title=

मुंबई : एप्रिल महिन्यात अक्षय कुमार, करण जोहरसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी कोरोना यौद्धांच कौतुक केलं आहे. त्यांनी कोरोना यौद्धांना 'केसरी' सिनेमातील 'तेरी मिट्टी' हे गाणं गाऊन समर्पित केलं होतं. नुकताच दिल्ली पोलिसातील एका जवानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

दिल्ली पोलिसांमधील जवान रज राठौरने अक्षय कुमारच्या 'केसरी' सिनेमातील 'तेरी मिट्टी' हे गाणं गायलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर हे गाणं नुकतंच शेअर केलं आहे. 'तेरी मिट्टी हे फक्त गाणं नाही आहे ही माझ्यासाठी एक भावना आहे. माझा पहिला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माझं खूप कौतुक झालं. यानंतर माझी खूप प्रशंसा झाली. मात्र मला अक्षय कुमार सरांच्या प्रतिक्रियेची प्रतिक्षा आहे.' असं त्याने म्हटलं होतं. अखेर अक्षय कुमारने त्याला यावर उत्तर दिलं आहे. 

अक्षय कुमारने हा व्हिडिओ ट्विट करत दिलं उत्तर पोलीस रजत राठोडची इच्छा पूर्ण झाली आहे. अक्षय कुमारने आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने कौतुक केलं आहे. 'हे गाणं ऐकून माझ्या अंगावर शहारे आले आहेत. मी हे गाणं कितीवेळाही ऐकलं तरी त्याची भावना सारखीच होती.' हा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल त्याने रजत यांचे आभार देखील मानले आहेत.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.