लग्नानंतरही 'या'अभिनेत्यांचं अफेअर; यादीमधील नाव वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही

त्यांनी कोणत्याही अभिनेत्या किंवा अभिनेत्रीसोबत काम केलं की, त्यांची नाव एकमेकांसोबत जोडली जातात.

Updated: Jan 25, 2022, 12:27 PM IST
लग्नानंतरही 'या'अभिनेत्यांचं अफेअर; यादीमधील नाव वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही title=

मुंबई :  बॉलीवूड सेलिब्रिटींच्या अफेर्सबद्दल तर तुम्ही एकलंच असेल. त्यांनी कोणत्याही अभिनेत्या किंवा अभिनेत्रीसोबत काम केलं की, त्यांचे नाव एकमेकांसोबत जोडलं जातात आणि त्यांच्या अफेअर्सच्या चर्चा होऊ लागतात. यांपैकी काही चर्चा या अफवा असतात, तर काही बातम्या खऱ्या असतात. या बातम्यांमध्ये अनेकदा विवाहित कलाकारांचीही नावे समोर आली आहेत. आज या रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही त्या कलाकारांबद्दल सांगणार आहोत जे बॉलिवूड अभिनेत्रींच्या प्रेमात पडून पूर्ते फसले आहेत. चला यादी पाहूया...

अजय देवगण (Ajay Devgn)

अजय देवगणची कंगना रणौतसोबत जवळीक वाढत असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यांच्या अफेअरची बातमी समोर आल्यानंतर काजोलकडून अजय देवगणला बरेच काही सुनावले गेले. एवढेच काय तर काजोल अजय देवगणचे घर सोडण्यास देखील तयार झाली होती.

अक्षय कुमार (Akshay Kumar)

अक्षय कुमार बॉलिवूड इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्यांपैकी एक आहे ज्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, एकेकाळी या अभिनेत्याचे नाव प्रियांका चोप्राशी जोडले गेले होते, ज्यामुळे ट्विंकल खन्नाला खूप राग आला होता. इतकंच नाही तर ट्विंकल खन्ना प्रियांका चोप्राला कानाखाली लावण्यासाठी देखील सेटवर आली होती. परंतु प्रियांका सेट वरती त्यावेळी हजर नव्हती.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)

अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरच्या बातम्या सगळ्यांनाच माहीत आहेत. मात्र, अमिताभ बच्चनसोबत लग्न केल्यानंतरही जया बच्चन खूपच रेखाला घेऊन इनसिक्योर होत्या.

अनिल कपूर (Anil Kapoor)

लग्नानंतर अनिल कपूरचे नाव माधुरी दीक्षितसोबत जोडले गेले. दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले होते. मात्रनंतर हे सगळं प्रकरण ठिक झालं.

मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty)

मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांच्या काळात अनेक अभिनेत्रींना डेट केले आहे. एकेकाळी मिथुन यांचे नाव श्रीदेवीसोबतही जोडले गेले होते. या दोघांनी गुपचूप एंगेजमेंटही केल्याच्या बातम्या आहेत.

सैफ अली खान (Saif Ali Khan)

अमृता सिंगपासून वेगळे झाल्यानंतर सैफ अली खानने करीना कपूरसोबत लग्न केले. 'टशन' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आले होते.

संजय दत्त (Sanjay Dutt)

संजय दत्तचे नावही अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. संजय दत्त आणि माधुरी दीक्षित एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जातं. मात्र, बॉम्ब ब्लास्टमध्ये संजय दत्तचे नाव समोर आल्यानंतर माधुरी दीक्षितने या अभिनेत्याशी संबंध तोडले.

शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha)

शत्रुघ्न सिन्हा यांचे अफेअर रीना रॉयसोबत होते. दोघांनी जवळपास 7 वर्षे एकमेकांना डेट केले होते. शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम यांना पती आणि रीनाच्या अफेअरबद्दल माहिती होती. त्यावेळी त्यांनी दोघांनाही रंगेहात पकडलं होतं. ज्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांना बायकोने सोडून जाण्याची धमकी दिली, त्यानंतर मुलांमुळे मग त्यांनी त्यांचं रीना रॉयसोबतचं नातं संपवलं.

शाहरुख खान (Shah Rukh Khan)

शाहरुख खानने अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्रींसोबत ऑनस्क्रीन रोमान्स केला आहे. शाहरुख खान आणि प्रियांका चोप्राच्या अफेअरची बातमी समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. तेव्हापासून शाहरुख आणि गौरी यांचा घटस्फोट झाल्याचे बोलले जात आहे.

सनी देओल (Sunny Deol)

या यादीत सनी देओलच्या नावाचाही समावेश आहे. सनी देओलचे डिंपल कपाडियासोबत अफेअर होते. दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, पण धर्मेंद्रने हे लग्न होऊ दिले नाही.