'या' प्रसिद्ध अभिनेत्याने खरेदी केलं जान्हवी कपूरचं घर, का आली अभिनेत्रीवर अशी वेळ?

बॉलिवूड स्टार्स त्यांच्या कमाईचा मोठा हिस्सा घर आणि गुंतवणुकीवर खर्च करतात. 

Updated: Jul 30, 2022, 05:09 PM IST
'या' प्रसिद्ध अभिनेत्याने खरेदी केलं जान्हवी कपूरचं घर, का आली अभिनेत्रीवर अशी वेळ? title=

मुंबई : बॉलिवूड स्टार्स त्यांच्या कमाईचा मोठा हिस्सा घर आणि गुंतवणुकीवर खर्च करतात. सध्या बरेच सेलिब्रिटी हे आपली मालमत्ता खरेदी-विक्री करत आहेत. आता बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याने सुद्धा आपल्या प्रॉपर्टीत वाढ केली आहे. राजकुमार रावने त्याच्यासाठी एक आलिशान घर विकत घेतलं आहे. विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिचं घर त्याने विकत घेतलं आहे.

44 कोटी रुपयांना विकत घेतलं ट्रिपलेक्स अपार्टमेंट
राजकुमार रावने एक शानदार ट्रिपलेक्स अपार्टमेंट घेतलं आहे. तब्बल 44 कोटी रुपयांना हे अपार्टमेंट त्याने विकत घेतलं आहे.  हे अपार्टमेंट मुंबईच्या जुहूमध्ये आहे.  या अपार्टमेंटची मालक याआधी जान्हवी कपूर होती. त्यानंतर आता या अपार्टमेंटचा मालक राजकुमार राव बनलाय. राजकुमार राव आणि जान्हवी कपूरने रूही चित्रपटात एकत्र काम केलं आहे. चित्रपटात प्रेक्षकांना दोघांची केमेस्ट्री पाहायला मिळाली. राजकुमार हे अपार्टमेंट विकत घेतल्यानंतर खूपच खुश आहे.  तर जान्हवी कपूरलाही या अपार्टमेंटची विक्री करून मोठा फायदा झालाय.

जान्हवी कपूरने हे अपार्टमेंट दोन वर्षांपूर्वी विकत घेतलं होतं. डिसेंबर 2020 मध्ये तिने 39 कोटी रुपयांना हे अपार्टमेंट खरेदी केलं होतं. आता हे अपार्टमेंट विकून तिला 5 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. या अपार्टमेंटचे क्षेत्रफळ 3456 स्क्वेअर फूट आहे. त्याची प्रति चौरस फूटची किंमत 1.27 लाख रुपये आहे. ही देशातील सर्वात महागडी डील आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते आणि बिल्डर आनंद पंडित यांनी ही इमारत बांधली आहे. या इमारतीला लोटस आर्य असं म्हणतात. मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार रावने हे अपार्टमेंट पत्नी पत्रलेखासाठी विकत घेतलं आहे. हे अपार्टमेंट 14व्या, 15व्या आणि 16व्या मजल्यापर्यंत आहे. या इमारतीत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी राहतात. राजकुमार आणि पत्रलेखा यांनी यापूर्वी एकाच इमारतीच्या 11व्या आणि 12व्या मजल्यावर अपार्टमेंट खरेदी केलं होतं.