'या' कारणामुळे आलिया-रणबीरनं लग्नानंतर बेबीसाठी केली घाई, वाचा काय होती रणबीरची इच्छा

39 वर्षीय रणबीरने यावर्षी एप्रिलमध्ये 29 वर्षीय आलिया भट्टसोबत लग्न केले.

Updated: Jul 17, 2022, 09:08 PM IST
'या' कारणामुळे आलिया-रणबीरनं लग्नानंतर बेबीसाठी केली घाई, वाचा काय होती रणबीरची इच्छा title=

मुंबईः लवकरच आलिया आणि रणबीरकडे एक नवा पाहूणा येणार आहे आणि त्यासाठी सध्या दोघंही चांगलेच रेडी आहेत त्यातून त्यांचा नवा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून रणबीर सध्या त्याच्या 'शमशेरा' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 

प्रमोशनसाठी रणबीर सध्या मीडियाशी फार मनमोकळ्या गप्पा मारत आहेत त्यामुळे त्याला विचारण्यात आलेल्या वैयक्तिक प्रश्नांना तो मोकळेपणाने उत्तरं देतो आहे. 

एकीकडे हा चित्रपट चर्चेत असतानाच दुसरीकडे रणबीर लवकरच वडील होणार आहे. 39 वर्षीय रणबीरने यावर्षी एप्रिलमध्ये 29 वर्षीय आलिया भट्टसोबत लग्न केले.

लग्नाच्या अडीच महिन्यांनंतर आलियाने प्रेग्नेंसीची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. लग्नानंतर लगेचच काही लोकांनी त्यांच्या गुड न्यूजवर आश्चर्य व्यक्त केले. अनेक प्रकारचे प्रश्नही प्रत्येकाच्या मनात आले आणि आता या सर्व प्रश्नांची उत्तरेही मिळाली आहेत. रणबीर कपूरने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले, त्याने विचार करायला सुरुवात केली होती की, जेव्हा त्याची मुलं मोठी होतील तेव्हा तो त्यांच्यासोबत खेळण्यास पुरेसा फिट असेल का? रणबीरच्या म्हणण्यानुसार, वयाच्या ४० व्या वर्षीच त्याने मुलाबद्दल विचार करायला सुरुवात केली आहे. 

जेव्हा लोक 40 च्या वर्षांचे होतात तेव्हा अनेकांची मुलं ही मोठी झालेली असतात. जेव्हा माणूस 40 वर्षांचा होतो तेव्हा जर मुलं होणार असतील तर पुढे ते मोठे होताना तुमचे वयही वाढते. तेव्हा माझे मूल जेव्हा 20 वर्षांचे होईल तेव्हा मी 60 वर्षांचा झालेलो असेन आणि चिंतेची बाब असल्याने त्यावर प्लॅनिंग होणं महत्त्वाचं आहे, असं रणबीर पुढे म्हणाला. तो वीस वर्षांचा झालाच तर त्याच्यासोबत मी खेळू शकेन का? मी ट्रेकिंगला जाऊ शकेन का? अशी शंकाही रणबीरने उपस्थित केली. 

 रणबीर आणि आलिया 'ब्रह्मास्त्र-पार्ट 1' मध्ये दिसणार आहेत. या चित्रपटातूनच दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. हा चित्रपट ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.