'सलमान मला परवडणारा नाही'.... Bharat pe च्या संस्थापकाने सांगितला सलमानचा 'तो' कटू अनुभव

Big Boss साठी सलमान अबजो रूपये मानधन घेतो

Updated: Jul 17, 2022, 08:31 PM IST
'सलमान मला परवडणारा नाही'.... Bharat pe च्या संस्थापकाने सांगितला सलमानचा 'तो' कटू अनुभव title=

मुंबईः सलमान खान हा Big Boss चा मोठा चेहरा आहे. Big Boss साठी सलमान अबजो रूपये मानधन घेतो. अनेक वादविवादांनंतर हा शो अत्यंत जोरदार चालत असून आता लवकरच या शोचा सोळवा सिझन येतो आहे. त्यामुळे अधिकाधिक या शोची लोकप्रियता वाढते आहे. 

सध्या सलमान खान वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आहे तसेच त्याचे 'हे' एक वादग्रस्त वक्तव्य सध्या चांगलेच व्हायरल होते आहे. हे विधान त्याच्या चित्रपटाशी किंवा Big Bossशी निगडित नसून ते एका वेगळ्याचा कारणासाठी व्हायरल होते आहे. 

सलमान खान आज बॉलीवूडमधील टॉप कलाकारांपैकी एक आहे. त्याने बॉलीवूडसाठी बरेच ब्लॉकबस्टर आणि हिट चित्रपट दिले आहेत. सलमान खान भाईजान म्हणून सगळीकडेच फेमस आहे आणि गेली तीस वर्षे तो प्रेक्षकांची मनं जिंकून आहे. पण सध्या त्याचे व्हायरल होत असलेले स्टेटमेंट पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

नुकताच Shark Tank हा रिएलिटी शो चांगला लोकप्रिय झाला होता. त्या शोमधून Bharat Pe चे संस्थापक अश्नीर गोव्हरही सहभागी झाले होते. जज म्हणून त्यांनी या शोमध्ये सहभाग घेतला होता. सध्या त्यांनी सलमान खानला घेऊन केलेले एक वक्तव्य चांगलेच व्हायरल होत आहे. हे वक्तव्य सलमानच्या चाहत्यांसाठी धक्का देणारे ठरले आहे. 

सलमान खानची फी आपल्याला परवडणापी नाही कारण ती आपल्या बजेटपेक्षाही फार जास्त आहे अशी माहिती अश्नीर ग्रोव्हरने दिली आहे. हा हिरो आम्हाला परवडणारा नाही असेच त्यांनी डारेक्ट सांगितले आहे. एका जाहिरातीसाठी सलमान खूप महागडा आहे अशी टीका केल्याने सलमान खरंच किती महागडा अभिनेता आहे याची प्रचिती येते. 

अश्नीर ग्रोव्हर आणि सलमान खानची नुकतीच एका जाहिरातीसाठी बोलणी झाली आणि तेव्हा सलमान एका जाहीरातीसाठी तब्बल 7 कोटी रुपये मागितले असल्याचे समोर आले आहे. सुरूवातीला सलमान हा 7 कोटी एवढी फी घेणार होता पण अश्नीरकडे तेव्हा पैसे नसल्याने सलमानच्या मॅनेजरला अश्नीरने थोडी फी कमी करायला सांगितली. 7 वरून सलमान 4 कोटींवर आला होता पण तेही देण्यासाठीचे पैसे अश्वीरकडे नव्हते तेव्हा सलमानचा मॅनेजर अश्नीरला म्हणाला, तूम्ही काय भेंडी बाजारात आला आहात का... किती मांडवली करता... शेवटी सलमानने त्याची जाहिरात नाईलाजाने 3 कोटी रूपयांमध्ये केली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 सलमानचा लवकरच बहुप्रतिक्षित चित्रपट 'कभी ईद कभी दिवाळी' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तसेच कतरिना कैफसोबत तो 'टायगर 3' मधून दिसणार आहे.