रणवीर सिंहसोबत 'या' मराठी कलाकाराची एन्ट्री

आपल्या अभिनयाने मराठीतही उमटवला ठसा 

रणवीर सिंहसोबत 'या' मराठी कलाकाराची एन्ट्री  title=

मुंबई : मराठी कलाकारांनी कायमच बॉलिवूडमध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आपल्या अभिनयाने मराठी कलाकारांनी बॉलिवूडमध्ये देखील आपला वेगळा चाहता वर्ग बनवला आहे. बॉलिवूडमध्ये अनेक दिग्दर्शक मराठी कलाकारांना प्राधान्य देतात. असं असताना आता आणखी एक मराठमोळा कलाकार बॉलिवूडमध्ये नव्या एन्ट्रीसाठी सज्ज झाला आहे. 

या मराठी कलाकाराचं नाव सिद्धार्थ जाधव. आपल्या अभिनयाने मराठीत वेगळा ठसा सिद्धार्थ उमटवला आहे. डान्स रिअॅलिटी शोमध्ये सिद्धार्थ जजच्या भूमिकेतही झळकत आहे. सिद्धार्थ जाधव आपल्या दमदार अभिनयासोबतच परफेक्ट टायमिंगसाठी देखील लोकप्रिय आहे. आता हा सिद्धू बॉलिवूडमध्ये झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. 

सिध्दूने आपल्या सोशल मीडियावर बॉलिवूडचा बाजीराव म्हणजे रणवीर सिंहसोबत फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने एक पोस्ट देखील शेअर केली आहे. मात्र तो कोणत्या सिनेमांत काम करणार आहे. हे देखील त्याने गुलदस्त्यात ठेवलं आहे.  या पोस्टमध्ये त्याने रणवीर सिंहचंही कौतुक केलं आहे. त्याची एनर्जी जबरदस्त असल्याचे सिद्धूने म्हटले आहे.तुफान एनर्जी असलेला मराठमोळा सिद्धू आणि बॉलिवूडचा भन्नाट एनर्जेटीक व्यक्ती रणवीर सिंह एकत्र आल्यावर काय धम्माल येईल हे पाहण्यासारखंच असणार आहे. म्हणून प्रेक्षक या नव्या प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.