फ्लाईटमध्ये 'या' दोन बॉलिवूड अभिनेत्रींचा सुटला ताबा; सगळ्यांसमोर केलं किस

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. 

Updated: Sep 29, 2022, 09:13 PM IST
फ्लाईटमध्ये 'या' दोन बॉलिवूड अभिनेत्रींचा सुटला ताबा; सगळ्यांसमोर केलं किस title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच एका फ्लाइटमध्ये तिची उर्वशी रौतेलाशी भेट झाली. दुबईहून मुंबईला परतत असताना दोघांची भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हा फोटो दीपिकाच्या एका फॅन क्लबने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये उर्वशी दीपिकाच्या गालावर किस करताना दिसत आहे. त्याचवेळी दीपिका  गोड स्माईल देताना दिसत आहे. दीपिका आणि उर्वशी ब्लॅक आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत.

फ्लाइटमधून उतरल्यानंतर दीपिका काळ्या ड्रेससह डेनिम जॅकेटमध्ये विमानतळाबाहेर दिसली. दरम्यान, गुरुवारी दुपारी तिने इन्स्टाग्रामवर आपल्या आगामी 'पठाण' या चित्रपटाबाबत अपडेट दिले. एक फोटो शेअर करत तिने या चित्रपटाचं डबिंग सुरू असल्याची माहिती दिली. या पोस्टसोबत तिने कॅप्शनमध्ये काम सुरू असल्याचं सांगितलं.

'पठाण' चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. जानेवारी 2023 मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटापूर्वी सिद्धार्थने हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफसोबत 'वॉर' बनवला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाव्यतिरिक्त दीपिकाकडे अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. ती प्रभाससोबत 'प्रोजेक्ट के'मध्ये काम करत आहे.

यासोबतच ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'द इंटर्न' आणि हृतिक रोशनसोबत 'फाइटर'मध्येही दिसणार आहे. शाहरुखच्या 'जवान'मध्येही ती एका खास भूमिकेत दिसणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  नुकतीच दीपिकाची तब्येत बिघडली होती. याच कारणामुळे तिला रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं.