आत्महत्या रोखण्यासाठी करण आणि हृतिकने उचलले पाऊल...

बॉलिवूड निर्माता व दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेता हृतिक रोशन  हे  काल झालेल्या World Suicide Prevention Day निमित्त जागरूकता निर्माण करण्यास सज्ज झाले.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 11, 2017, 10:59 AM IST
आत्महत्या रोखण्यासाठी करण आणि हृतिकने उचलले पाऊल...  title=

मुंबई : बॉलिवूड निर्माता व दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेता हृतिक रोशन  हे  काल झालेल्या World Suicide Prevention Day निमित्त जागरूकता निर्माण करण्यास सज्ज झाले. हृतिकने शनिवारी एक व्हिडीओ शेयर केला. त्यात असे म्हटले होते की, कोणत्याही व्यक्तीला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्यासाठी तिचे म्हणणे ऐकून घेणे गरजेचे आहे. 

हृतिकने व्हिडीओ शेयर करताना त्यात असे म्हटले होते की, "World Suicide Prevention Day निमित्त व्यक्तीचे म्हणणे नीट ऐकून घेण्याचे वचन देऊया आणि जीवन वाचवूया." करणने देखील तोच व्हिडीओ शेयर केला आणि त्याचे देखील हेच म्हणणे होते. त्यात त्यांनी आदित्य बिर्ला वर्ल्ड अॅकेडमी आणि आदित्य बिर्ला इंटीग्रेडेड स्कुल यांच्या संस्थापक आणि अध्यक्ष नीरजा बिर्ला यांना देखील टॅग केले आहे. 

 

बिर्ला यांनी अभियानाची सुरुवात करण्याबरोबरच ट्विटरवर लिहिले की, "World Suicide Prevention Day निमित्त आयोजित ईएआरएफओआरओ आंदोलनात सहभागी व्हा. ऐका, एक जीवन वाचू शकेल."

एमपावर च्या अधिकृत पेजनुसार असे दिसून येते की, त्यांना लोकांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये मानसिक स्वास्थ्याबद्दल अधिकाधिक जागरूकता निर्माण करायची आहे आणि मानसिक विकारांबद्दल लढण्यासाठी लोकांना सक्षम करायचे आहे. सल्ला देऊन आत्महत्या कमी करण्याकडे त्यांचा भर राहील.