दोन दिवसांत अक्षयच्या 'टॉयलेट' सिनेमाची ३० कोटींची कमाई

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या टॉयलेट : एक प्रेमकथा या सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात केली असली तरी दुसऱ्या दिवशी या सिनेमाने मोठी झेप घेतलीये.

Updated: Aug 13, 2017, 05:19 PM IST
दोन दिवसांत अक्षयच्या 'टॉयलेट' सिनेमाची ३० कोटींची कमाई title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या टॉयलेट : एक प्रेमकथा या सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात केली असली तरी दुसऱ्या दिवशी या सिनेमाने मोठी झेप घेतलीये.

पहिल्या दिवशी या सिनेमाने १३.१० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने १७.१० कोटी रुपयांची कमाई केलीये. म्हणजेच शुक्रवारी सिनेमा प्रदर्शित झाल्य़ानंतर दोन दिवसांत या सिनेमाने ३० कोटी रुपये कमावलेत. 

गेल्या शुक्रवारी शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांच्या जब हॅरी मेट सेजल या सिनेमाने पहिल्या दिवशी १५.२५ लाखांची कमाई केली होती. शनिवार आणि रविवारीही या सिनेमाने १५ कोटी कमावले होते. मात्र सोमवारी रक्षाबंधनाची सुट्टी असतानाही या सिनेमाने केवळ ७ कोटी १५ लाख कमावले.