अनुपम खेर यांच्या 'रांची डायरीज'चा ट्रेलर प्रदर्शित

अनुपम खेरच्या 'रांची डायरीज' या सिनेमाचं ट्रेलर लॉन्चिंग मंगळवारी मुंबईत पार पडलं. 

Updated: Sep 13, 2017, 04:08 PM IST
अनुपम खेर यांच्या 'रांची डायरीज'चा ट्रेलर प्रदर्शित

रांची : अनुपम खेरच्या 'रांची डायरीज' या सिनेमाचं ट्रेलर लॉन्चिंग मंगळवारी मुंबईत पार पडलं. 

अनुपम खेर यांचा निर्माता म्हणून हा पहिलाच चित्रपट... सात्विक मोहंती यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. झारखंडमध्येच या सिनेमाचं बहुतांश शुटिंग करण्यात आलंय. 

या सिनेमात सौंदर्या शर्मा, हिमाश कोहली, ताहा शाह, जिम्मी शेरगिल आणि अनुपम खेर हे मुख्य भूमिकेत दिसतील. या सिनेमा येत्या ५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

सलमान खान, करण जोहर यांनीही या सिनेमाला शुभेच्छा दिल्यात.