'तुला पाहते रे' झी मराठीवर नवी मालिका...

झी मराठीवरील ही मालिका घेणार निरोप

'तुला पाहते रे' झी मराठीवर नवी मालिका...   title=

मुंबई : झी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी कायम नवनवीन मालिका घेऊन येत असते. आता झी मराठीवर लवकरच नवी मालिका येणार आहे. 'तुला पाहते रे' असं या मालिकेचं नाव असून नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं सेम असतं... असं किती ही म्हटलं तरी प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा आपल्याला पाहायला मिळतात. वय विसरायला लावणारी जगावेगळी प्रेम कहाणी आपल्याला या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेचा प्रोमो रविवारी लाँच करण्यात आला. (हे पण वाचा : झी मराठीवरील 'ही' लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

अभिनेता सुबोध भावे पुन्हा एकदा 'झी मराठी' वाहिनीवर पुनरागमन करत छोट्या पडद्यावरआपली जादू दाखवणार आहे. तब्बल दोन वर्षांनंतर तो टीव्ही मालिकेकडे पररतो आहे. 'तुला पाहते रे' या मालिकेद्वारे सुबोध भावे छोट्या पुन्हा पडद्यावर एंट्री करतोय. हि मालिका आहे "इशा आणि विक्रम सरंजामे” यांच्या प्रेमाची. या मालिकेचा नुकताच प्रोमो रिलीज झाला असून या मालिकेतून "गायत्री दातार" हि नवोदित अभिनेत्री छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. हि मालिका लवकरच झी मराठीवर दाखल होणार आहे.