व्हिडिओ : भारती सिंह आणि हर्षचा रोमँटिक व्हेडिंग साँग

आपल्या विनोदाने प्रेक्षकांना भरभरून हसवणारी कॉमेडियन भारती सिंह लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Nov 21, 2017, 08:47 PM IST
 व्हिडिओ : भारती सिंह आणि हर्षचा रोमँटिक व्हेडिंग साँग title=

मुंबई : आपल्या विनोदाने प्रेक्षकांना भरभरून हसवणारी कॉमेडियन भारती सिंह लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. 

येत्या ३ डिसेंबरला बॉयफ्रेन्ड हर्ष लिंबाचियासोबत तिचा विवाह होणार आहे. हा विवाह सोहळा गोव्यात संपन्न होणार आहे. या दोघांच्या लग्नाच्या तयारीचे किंवा त्यांचे आताचे अपडेट सर्वांनाच पाहायचे आहेत. त्या सर्वांसाठी हा खास व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’च्या धर्तीवर ‘दुल्हा हम ले जायेंगे’असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले होते. आता भारती व हर्षच्या या प्री-वेडिंग व्हिडिओ साँग समोर आले आहे. आणि ते व्हायरल होत आहे. 

होय, या वेडिंग साँगमध्ये भारती व हर्षचा रोमॅन्टिक अंदाज बघण्यासारखा आहे. ‘भारती का रोमान्स’,‘भारती की बारात’ या नावाने भारती व हर्षच्या वेडिंग साँगचा व्हिडिओ वेगात व्हायरल होतो आहे. भारतीसाठी गिटार वाजवणारा हर्ष, तिला खळखळून हसवणारा, तिच्यासोबत काही रोमॅन्टिक क्षण घालवणारा हर्ष हे सगळे पाहणे, भारतीच्या चाहत्यांसाठी निश्चितपणे एक वेगळा अनुभव असेल. हा व्हिडिओ तुम्हीही पाहा आणि तुम्हाला कसा वाटला, ते आम्हाला नक्की कळवा.

भारती व हर्ष दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. लग्नानंतर हे कपल युरोपमध्ये हनीमूनला जाणार आहे. दोघेही २० ते २५ दिवस युरोपातील वेगवेगळ्या शहरात फिरणार आहेत. भारतीच्या गेस्ट लिस्टमध्ये शाहरुख खान, सलमान खान, करण जौहर, माधुरी दीक्षित, मलायका अरोरा यांसारख्या सेलिब्रिंटींची नावे आहेत. या सगळ्यांना भारती स्वत: जाऊन आमंत्रणं देणार आहे.