पहिल्याच सिनेमातून स्टार झालेला 'हा' अभिनेता आता करतोय 'हे' काम

असं काय काम करतोय?

पहिल्याच सिनेमातून स्टार झालेला 'हा' अभिनेता आता करतोय 'हे' काम  title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे पहिल्याच सिनेमानंतर 'स्टार' झाले आहेत. अगदी पहिल्याच सिनेमातून प्रेक्षकांना आणि फिल्म इंडस्ट्रीला आपली दखल घ्यायला भाग पाडलेला हा कलाकार आहे. पण सध्या हा कलाकार नेमका कुठे आहे याचा शोध सुरू आहे. या अभिनेत्याचं नाव आहे नकुल शर्मा. हा तोच अभिनेता आहे ज्याने 'तुमसे अच्छा कौन है' या सिनेमात लीड रोल केला असून खूप लोकप्रियता मिळवली आहे.

'तुमसे अच्छा कौन है' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये लोकप्रियता मिळवलेल्या नकुल कपूरला आज जग विसरलं आहे. पण एक वेळ अशी होती जेव्हा या अभिनेत्यावर लाखो मुली आपला जीव ओवाळून टाकत असे. मुली देखील या अभिनेत्याचा पहिलाच सिनेमा पाहून वेड्या झाल्या होत्या. 

नकुलने आपल्या करिअरची सुरूवात 1998 मध्ये 'हो गई है मोहब्बत तुमसे' या अल्बममधून केली आहे. यानंतर 2001 मध्ये 'आजा मेरे यार' मध्ये काम केलं आहे. मात्र, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल करू शकली नाही. यानंतर 2002 मध्ये नकुलला 'तुमसे अच्छा कौन है' हा सिनेमा मिळाला. या सिनेमानंतर संपूर्ण देशात त्याचे लोकप्रियता वाढली. त्याने पैसे देखील खूप कमावले मात्र नकुल आपलं स्टारडम सांभाळू शकला नाही. नकुलने 'हो गई है मोहब्बत तुमसे' या अल्बममधून शिबानी कश्यपसोबत काम केलं आहे. या अल्बमला पाहून त्याला अनेक सिनेमाच्या ऑफर मिळाल्या. 

 

'तुमसे अच्छा कौन है'मधून नकुलने किम शर्मा आणि आरती छबरियासोबत काम केलं आहे. या सिनेमातील गाणी अगदी सुपरहिट झाली आहेत. मात्र या सिनेमानंतर नकुलला कोणत्याच सिनेमाची ऑफर मिळाली नाही. त्याने 2005 मध्ये टीव्ही सिरियल Terminal City मध्ये काम केलं आहे. खूप वेळ काम न मिळाल्यामुळे त्याने बॉलिवूडशी असलेलं आपलं नात सोडलं आहे. नकुल भारत सोडून कॅनडामध्ये वसला. आणि तेथे डिवाइन लाइट नावाचं योगा इन्सिट्यूट सुरू केलं आहे. इथे येणाऱ्या लोकांना तो योगा शिकवतो. नकुल आता योगा टीचर झाला आहे. नकुलने वजन आणि दाढी देखील वाढवली आहे. आता तर त्याला ओळखणं देखील कठीण झालं आहे. मध्ये तर अशी देखील माहिती समोर आली होती की, नकुलचा मृत्यू झाला आहे. यानंतर नकुलने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्यासमोर येणं पसंद केलं आहे. आता तो ठिक असून कॅनडामध्ये आहे. आता नकुलकडे अनेक सिनेमांच्या ऑफर आल्या आहेत मात्र त्याचा भारतात परत येण्याचा काही विचार नाही.