'या' अभिनेत्रीला मिळाली Casting Couch ची ऑफर

टीव्ही इंडस्ट्री असो वा बॉलिवूड, कास्टिंग काऊचचा सामना तर सर्वांनाच करावा लागतो. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Nov 30, 2017, 12:44 PM IST
'या' अभिनेत्रीला मिळाली Casting Couch ची ऑफर  title=

मुंबई : टीव्ही इंडस्ट्री असो वा बॉलिवूड, कास्टिंग काऊचचा सामना तर सर्वांनाच करावा लागतो. 

आणि याची चर्चा कायमच होताना दिसते. अशाच एका कास्टिंग काऊचची ऑफर मिळणाऱ्या अभिनेत्रीने हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर उघड केला आहे. टीव्ही अभिनेत्री सुलग्ना चॅटर्जीने आपल्यासोबत घडलेला हा प्रकार सोशल मीडियावर शेअर केला आहे. सुलग्नाला मिळालेल्या या ऑफरच्या मॅसेजचा स्क्रीन शॉर्ट तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सुलग्ना ही आपल्याला टीव्ही सिरियल 'सौभाग्यवती भव:' मध्ये दिसली आहे. 

काय आहे हा प्रकार?

casting couch

सुलग्ना चॅटर्जीला एजंटने एक प्रोजेक्टची ऑफर दिली. आणि त्यावेळी सांगितले की, हा कॉम्प्रो प्रोजेक्ट आहे. आणि तिला पूर्ण पैसे मिळाल्यानंतर हे करावं लागेल. या चॅटमध्ये त्या एजंटने हे देखील सरळ सांगितलं आहे की, ही डिमांड दिग्दर्शकाची आहे. यावेळी सुलग्नाने अगदी शांतीपूर्वक या ऑफरला रिजेक्ट केलं आहे. 

सुलग्नाने मॅसेजवर झालेल्या या चर्चेला स्क्रिनशॉट काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे. कास्टिंग काऊज ही या सिनेनगरीतील एक कटू सत्य आहे. अनेक मान्यवर आणि लोकप्रिय कलाकारांना या कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला आहे. मात्र खूप कमी वेळा असं झालं आहे की, कास्टिंग काउचच्या या प्रश्नावर कुणी सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यामुळे आता सुलग्नाचं भरपूर कौतुक सोशल मीडियावर होत आहे.