या अभिनेत्रीचे बॅंक अकाऊंट हॅक, २ लाखाचा गंडा

अदा खान डेबिट कार्ड हॅक करुन २ लाखाचा गंडा घातला गेला. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Jan 22, 2018, 09:41 AM IST
या अभिनेत्रीचे बॅंक अकाऊंट हॅक, २ लाखाचा गंडा title=

मुंबई  : कलर्स चॅनलवरील 'नागिन' सिरिअलमध्ये नागिन 'शेषा'ची भूमिका साकारणारी अदा खान सायबर क्राइमची शिकार झाली आहे. तिचे डेबिट कार्ड हॅक करुन २ लाखाचा गंडा घातला गेला.

२ लाखांचा गंडा 

आजतक.कॉमच्या वृत्तानुसार, अदा खानने सांगितले की तिच्या अकाऊंटमधून २४ हजार रुपये गेले. आपल्या कार्डचा उपयोग केला जातोय हे तिच्या लक्षात आले.

त्यानंतर तिला सलग ४ मेसेज आले यामध्ये तिचे २ लाख रुपये गेले. 

कार्ड ब्लॉक

तिने लगेच बॅंकेत फोन करुन डेबिट कार्ड ब्लॉक केले. बॅंक आणि पोलिसांनी यात चांगली मदत केल्याचे अदा खानने सांगितले.