'तिच्यासारखी बायको...' उमेश कामतनं सांगितलं प्रियाशी लग्न करण्याचं खरं कारण

Priya Bapat and Umesh Kamat: प्रिया बापट आणि उमेश कामत हे फारच लोकप्रिय कलाकार आहेत आणि सोबतच त्यांची जोडीही प्रचंड लोकप्रिय आहे. त्यातून आता चर्चा आहे ती म्हणजे उमेश कामतची. आपण प्रियाशी लग्न का केलं याचा खुलासा त्यानं केला आहे. नक्की तो काय म्हणाला आहे? 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 3, 2023, 03:38 PM IST
'तिच्यासारखी बायको...' उमेश कामतनं सांगितलं प्रियाशी लग्न करण्याचं खरं कारण title=
August 3, 2023 | umesh kamat reveals why he married actress priya bapat

Priya Bapat and Umesh Kamat: प्रिया बापट आणि उमेश कामतची जोडी ही अख्ख्या महाराष्ट्राची आवडती जोडी आहे. त्यांनी अनेक मालिका, नाटकं आणि सिरियल्समधून कामं केली आहेत. 2011 साली त्यांनी एकमेकांशी लग्न केले होते. 'नवा गडी नवं राज्य' हे त्यांचे नाटक प्रचंड गाजले आहे. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली होती. आता त्यांचे एक नवे नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचे नावं आहे 'जर तरची गोष्ट'. लवकरच या नाटकाचा शुभारंभ प्रयोग होणार आहे. त्यामुळे सध्या ते या नाटकाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अशावेळी त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. सध्या प्रिया आणि उमेशची एक वेगळीच चर्चा रंगलेली आहे. उमेशनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतून आपण प्रियाशी लग्न का केलं याचा खुलासा केला आणि एक गमतीशीर उत्तर दिलं आहे. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की नक्की काय म्हणाला आहे? 

उमेश कामत आणि प्रिया बापट यांचे 'जर तरची गोष्ट' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग हा 5 ऑगस्टला प्रदर्शित होतो आहे. जवळपास 10 वर्षांनंतर ते दोघं एकत्र एका नाटकांमधून परत येताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या या नाटकात उमेश कामत आणि प्रिया बापटसह आशुतोष गोखले आणि पल्लवी अजय हे कलाकार दिसणार आहेत. इरावती कर्णिक यांनी या नाटकाचे लेखन केलं असून रणजीत पाटील आणि अद्वैत दादरकर या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. 

सध्या चर्चा आहे ती म्हणजे प्रिया आणि उमेश यांची. सोशल मीडियावरही प्रिया आणि उमेश हे प्रचंड लोकप्रिय आहेत. काही वर्षांपुर्वी आलेली त्यांची '...आणि काय हवं?' ही वेबमलिका जोरात फेमस झाली होती. त्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा रंगली होती. त्यातून सध्या त्यांच्या नाटकाची जोरात चर्चा आहे. एका व्हिडीओमध्ये त्यांच्या या नव्या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळाल्याची झलक समोर आली होती. यावेळी त्यांच्या नाटकांच्या तिकिटांना चांगलाच प्रतिसाद मिळला होता. उमेशनं ‘मीडिया टॉक मराठी’ या पोर्टलला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यानं आपल्या आणि प्रियाच्या नात्याविषयी खुलासा केला आहे. प्रिया आणि उमेश ही आपली सर्वांचीच लाडकी आणि लोकप्रिय जोडी आहे त्यामुळे त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल जाणून घ्यायला प्रत्येकालाच आवडते. 

हेही वाचा - वडील बॅंकेत नोकरीला, मुलगा विनोदानं जिंकतोय प्रेक्षकांची मनं; 'हा' अभिनेता आज कोट्यवधींचा मालक

यावेळी उमेश म्हणाला की, “‘दे धमाल’ या मराठी मालिकेच्या निमित्ताने मी सगळ्यात आधी प्रियाला पाहिलं होतं. त्या मालिकेच्या टायटल सॉन्गमध्ये ती गोल फिरून वगैरे जायची ते मला खूप आवडायचं. हा किस्सा मी तिला अनेक वर्ष सांगतो आहे. त्यानंतर ‘आभाळमाया’ या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर आम्ही प्रत्यक्ष भेटलो. संपूर्ण शूटिंगदरम्यान आम्ही एकमेकांशी फार बोललो नव्हतो. शूटिंगच्या शेवटच्या दिवशी आम्ही एकमेकांचे नंबर घेतले होते.”

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

''आधी गर्लफ्रेंड मग लग्न आता मी प्रियाच्या प्रचंड खोड्या काढतो. मला तिच्या खोड्या काढता याव्यात म्हणून मी तिच्याशी लग्न केलं असं म्हणायला हरकत नाही. अगदी खरं सांगायचं झालं तर तिच्यासारखी बायको मिळाली मग आणि काय हवं?'' असं तो म्हणाला आहे.