Sunil Grover Net Worth : कपिल शर्माच्या शोमधून अनेकांना प्रसिद्धी आणि पैसा मिळाला आहे. त्यातून या शोनं प्रेक्षकांचेही भरपूर प्रमाणात मनोरंजन केले आहे. त्यामुळे या शोची चांगलीच चर्चा रंगलेली होती. कपिल शर्मासह अजून कोणत्या एका कलाकाराला लोकप्रियता मिळाली असेल तर ती व्यक्ती म्हणजे सुनील ग्रोवर. सुनील ग्रोवर हा अभिनेता प्रचंड लोकप्रिय आहे. या अभिनेत्यानं फार मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे सुनील ग्रोवरचीही चांगलीच चर्चा असते. सुनील ग्रोवरचा आज 46 वा वाढदिवस आहे. त्यामुळे सध्या त्याचीच चर्चा आहे. 'द कपिल शर्माच्या शो'मधून त्याची चांगलीच लोकप्रियता वाढलेली आहे. गुथ्थी या कॅरेक्टरमुळे तो चांगलाच चर्चेत आलेला आहे. परंतु तुम्हाला हे माहितीये का की सुनील ग्रोवर याची नक्की नेटवर्थ किती आहे? समोर आलेल्या माहितीनुसार असे कळते की त्याची नेटवर्थ ही कपिल शर्माहूनही जास्त आहे.
तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की नक्की त्याची कमाई, नेटवर्थ, खर्चे किती आहे? सुनील ग्रोवर याचा जन्म हा 3 ऑगस्ट 1977 साली झाला आहे. हरियाणाच्या मंडी डबवाली या शहरात त्याचा जन्म झाला आहे. त्याचे वडील हे स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर होते. त्यानं आपलं शालेय शिक्षण हे आर्य विद्या मंदिर डबवाली येथून केले आहे. त्यांनी पंजाब युनिव्हर्सिटी, चंदीगढ येथून मास्टर डिग्री मिळवली आहे. त्यानं कॉलेजमध्ये असतानाच आपल्या विनोदाच्या करिअरला सुरूवात केली होती. त्यातून कॉलेजमध्ये असताना जसपाल भट्टी यांनी सुनील ग्रोवरला संधी दिली. त्यानंतर त्यानं मागे वळून पाहिलेच नाही. त्यानं तेव्हा एका सिरियलमधूनही कामं करायला सुरूवात केली होती. परंतु अचानक त्याला त्या शोचे कॉल्स येणं बंद झाले होते आणि त्याला कळण्यात आले की, चक्क त्याला या शोमधून काढून टाकण्यात आले आहे.
हेही वाचा - रणवीरच्या चेष्टामस्करीनं आलिया हैराण; मग तिला केलं कीस, 'हा' Video तुम्ही पाहिलात का?
सुनिल ग्रोवरनं अनेक संघर्षातून आणि अपयशातून जाऊन 'द कपिल शर्मा' हा शो केला. त्याला या शोमधून चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगली होती. गुथ्थी हे पात्र त्याच्या एका क्लासमेट्सच्या प्रेरणेवरून आलं आहे. त्यातून असंही कळते की ते आपल्या पत्नीला जोक सांगतात आणि मग त्यावर पत्नी हसली तरच तो जोक आपल्या परफॉर्मन्समध्ये घेतात. मध्यंतरी सुनील ग्रोवरमध्ये आणि कपिल शर्मात वादही वाढू लागले होते.
दैनिक भास्करच्या रिपोर्टनूसार, सुनील ग्रोवरची नेटवर्थ ही 24 कोटी रूपये आहे. तो एका ब्रॅण्ड एन्डोर्समेंटसाठी 50-60 लाख रूपये घेतो. त्यानं 2013 मध्ये 3 कोटी रूपयांचा फ्लॅट घेतला होता. त्यांच्याकडे रोवर, ऑडी, बीएमडबल्यू गाड्याही आहेत.