खळबळजनक! सुशांतच्या नावे अखेरचं पत्र लिहित लहानग्या चाहतीची आत्महत्या

त्याच्या निधनानंतर तिनं...   

Updated: Jul 27, 2020, 10:14 AM IST
खळबळजनक! सुशांतच्या नावे अखेरचं पत्र लिहित लहानग्या चाहतीची आत्महत्या  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येला महिना उलटत नाही, तोच त्याच्या काही चाहत्यांनीही आयुष्य संपवल्याच्या घटना घडल्याचं पाहायला मिळालं. सध्याच्या घडीला अशीच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जेथे सुशांतच्या अवघ्या १३ वर्षीय चाहतीनं आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. 

छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी ही घटना घडली. जेथे इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या आणि सुशांतची चाहती असणाऱ्या या मुलीनं आत्महत्येचं पाऊल उचललं. या घटनेमुळं तिच्या कुटुंबाला जबर धक्का बसला. गुरुवारी सकाळी या मुलीचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती पोलिसांकडून देण्यात आली. ती एकटी घरी असतेवेळीच ही घटना घडल्याचं पोलीस अहवालात म्हटलं गेलं आहे. 

पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मुलीचे आई-वडील जेव्हा घरी आले तेव्हा घराचं दार आतून बंद असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा मागच्या दारानं घरात गेलं असता मुलीनं गळफास लावल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आत्महत्या करण्यापूर्वी त्या मुलीनं एक पत्रही लिहिल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. सुशांत सिंह राजपूत हे जग सोडून गेल्यामुळं आपणही आयुष्य संपवत असल्याचं या मुलीनं पत्रात लिहिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. 

स्थानिक माध्यमांशी या मुलीच्या वडिलांनी संवाद साधतना दिलेल्या माहितीनुसार सुशांतत्या निधनानंतर ती नैराश्यात होती. ती सतत सुशांतचे व्हिडिओ पाहायची, त्याच्या चित्रपटातील गाणी ऐकायची, असं ते म्हणाले होते. असं असलं तरीही सध्या पोलिसांकडून सर्व दृष्टीकोनातून या आत्महत्येचा तपास केला जात असल्याचं वृत्त India.comनं प्रसिद्ध केलं आहे.