आजारपणानंतर Urfi Javed चं दमदार कमबॅक, रिव्हिलिंग ड्रेसमधला VIDEO पोस्ट

उर्फीने रिव्हिलिंग ड्रेस घालून एक व्हिडिओ शेअर केलाय. 

Updated: Aug 12, 2022, 08:33 PM IST
 आजारपणानंतर Urfi Javed चं दमदार कमबॅक, रिव्हिलिंग ड्रेसमधला VIDEO पोस्ट  title=

मुंबई : सोशल मीडिया सेन्सेशनल उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. मात्र मध्यंतरी ती आजारी पडल्याने सोशल मीडियावर फार क्वचितच सक्रिय होती.आता आजारपणातून बरी झाल्यानंतर तिने सोशल मीडियावर दमदार पुनरागमन केलं आहे. उर्फीने रिव्हिलिंग ड्रेस घालून एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगलीय. 

उर्फी जावेदला (Urfi Javed) काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उर्फीला ताप आणि उलट्यांचा त्रास जाणवत होता. शरीरातील डिहायड्रेशनमुळे तिला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दरम्यान ती सोशल मीडियापासून काहिशी दुर होती. मात्र आता आजारपणातून बरी झाल्यानंतर तिने पुन्हा एकदा सोशल मीडिय़ावर दमदार एंन्ट्री मारलीय. 

व्हिडिओत काय? 
उर्फी जावेदने (Urfi Javed) आजारपणातून बरे झाल्यानंतर चाहत्यांना धक्काचं दिलाय. उर्फी जावेदने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती सिझलिंग आउटफिटमध्ये दिसत आहे. वायरिंग ब्रा आणि स्कर्टसह उर्फी जावेदने तिचा लूक पुर्ण केला आहे. उर्फीने अत्यंत आत्मविश्वासाने ब्रालेस आऊटफिट कॅरी केला आहे. दरम्यान रिव्हिलिंग ड्रेस आणि लुक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Uorfi (@urf7i)

लुकची चर्चा
उर्फी जावेदचा (Urfi Javed) हा लुक खुपच हटके आहे.या लुकमध्ये तिने न्यूड लिपस्टिक, प्लेन पोनीटेल, सिल्व्हर हाय हिल्स आणि नाकात नथ घातली आहे. उर्फीच्या मागे एक साधा तपकिरी सोफा ठेवला आहे, ज्याच्या समोर उभी राहून ती आपले केस हलवत कॅमेरात पोज देताना दिसत आहे. उर्फीचा हा लुक अनेकांच्या पसंतीस उतरला आहे.  

उर्फी जावेदच्या (Urfi Javed) या व्हिडिओला काही मिनिटांतच 50 हजार लाइक्स आले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खुप चर्चेत आहे.