'या' टीव्ही अभिनेत्रीचं पाच वर्ष शोषण

बॉयफ्रेंड करत होता मारहाण 

'या' टीव्ही अभिनेत्रीचं पाच वर्ष शोषण  title=

मुंबई : टीव्ही अभिनेत्री 'उतरन'मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री टीना दत्त काही दिवसांपासून चर्चेत आहे. टीनाने एका मुलाखतीत आपल्या रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा केला आहे. 

टीनाने सांगितलं की, 2015 सालापर्यंत म्हणजे जवळपास पाच वर्षे ती अशा रिलेशनशिपमध्ये होती जिथे तिने प्रचंड सोसलं आहे. ती अशा व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती ज्या व्यक्तीने तिला खूप मारहाण केली आहे. 

अभिनेत्री टीना दत्ताने अनेक वर्षानंतर हॉरर शो 'डायन'मधून वापसी केली आहे. या शोमध्ये ती महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

या अगोदर टीना 'कर्मफल दाता शनि'मध्ये शेवटची दिसली होती. या मालिकेत तिने देवी दामिनीची भूमिका साकारली आहे. 

पाचवर्षे घरगुती अत्याचार सहन केल्यानंतर टीनाने 2015 मध्ये आपल्या बॉयफ्रेंडशी नातं संपवलं आहे. आणि आता ती नवीन पद्धतीने आयुष्य जगत आहे. 

टीनाने मुलाखतीत सांगितलं की, ती आपल्या बॉयफ्रेंडवर खूप प्रेम करत होती. त्या प्रेमाखातरच तिने अनेक मार देखील सहन केला आहे. पण जेव्हा बॉयफ्रेंडने आपल्या मित्रासमोर तिला मारलं तेव्हा मात्र तिने हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला. 

टीना सांगते की, 'तिला लव्हमॅरेज करायचं होतं. पण प्रेमात जे काही झालं त्यावर आता तिला काहीच बोलायचं नाही'.टीनाने ऐश्वर्या रायसोबत 'चोखेर बाली' या सिनेमात काम केलेलं आहे. 

टीना काही दिवसांपू्र्वी आपल्या फोटोशूटमुळे खूप चर्चेत आली होती. फोटोशूटमध्ये ती एका न्यूड व्यक्तीच्या पाठीवर बसलेली दिसले. या फोटोशूटची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. या अगोदर देखील तिने फोटोजच्या माध्यमातून हॉटनेस दाखवला आहे.