व्हिडिओ : क्रिकेटची गल्ली... रोजी रोटी डोंबिवली!

Last Updated: Saturday, August 12, 2017 - 21:11

मुंबई : झी मराठीच्या 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या स्वातंत्र्य दिन विशेष भागात सहभागी होणार आहेत भारतीय क्रिकेट महिला संघाच्या खेळाडू...  

ज्यांनी आपल्या अफाट कामगिरीने आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धा गाजवली आणि अंतिम फेरीत धडकही मारली. या महिला संघातील मराठमोळ्या असलेल्या स्मृती मंधाना, मोना मेश्राम, पूनम राऊत, पंजाबची हरमनप्रीत कौर आणि या संघाचे प्रशिक्षक तुषार आरवठे हे सहभागी झाले होते. 

येत्या १४ आणि १५ ऑगस्टला रात्री ९.३० वाजता भाग प्रसारित होणार आहेत. 

First Published: Saturday, August 12, 2017 - 20:48
comments powered by Disqus