श्रीदेवींचं अंत्यदर्शन घेऊन अभिनेत्री विद्या बालनला अश्रू झाले अनावर

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचा शेवटचा प्रवास सुरु झाला आहे. श्रीदेवी यांचं पार्थिव अत्यंदर्शनासाठी सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये ठेवण्यात आलं होतं. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 28, 2018, 03:20 PM IST
श्रीदेवींचं अंत्यदर्शन घेऊन अभिनेत्री विद्या बालनला अश्रू झाले अनावर title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचा शेवटचा प्रवास सुरु झाला आहे. श्रीदेवी यांचं पार्थिव अत्यंदर्शनासाठी सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये ठेवण्यात आलं होतं. 

चांदनीच्या शेवटच्या दर्शनासाठी बॉलिवूडपासून तिच्या सामान्य चाहत्यांपर्यंत सगळ्यांनीच गर्दी केली होती. आपल्या अभिनयाने अनेकांचं मन जिंकणारी श्रीदेवी आता आपल्यात नाही यावर विश्वास ठेवायला कोणीच तयार नाही. अनेक बॉलिवूड कलाकारांना यावेळी अश्रू अनावर झाले.

श्रीदेवीला शेवटचा निरोप देण्यासाठी आलेल्या विद्या बालनला देखील रडू कोसळलं. दर्शन घेऊन आल्यानंतर ती रडतच बाहेर आली. लाल रंगाच्या साडीमध्ये एखाद्या वधूप्रमाणे श्रीदेवींना सजवलं गेलं आहे.  मोगऱ्याच्या फुलांना सजवलेल्या  गाडीतून अंतिम प्रवास सुरु झाला आहे. अंतिम संस्कारासाठी दक्षिण भारतीय पंडितांना बोलवण्यात आलं आहे.