कॉन्सर्टदरम्यान गायकाचा आवाज जाताच हजारो चाहत्यांनी एका सुरात पूर्ण केलं गाणं, Video पाहून येतोय अंगावर काटा

Trending Video : सोशल मीडियामुळं जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. यातच आता एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय जो पाहून अनेकांचेच डोळे पाणावतायत.   

सायली पाटील | Updated: Jun 30, 2023, 09:33 AM IST
कॉन्सर्टदरम्यान गायकाचा आवाज जाताच हजारो चाहत्यांनी एका सुरात पूर्ण केलं गाणं, Video पाहून येतोय अंगावर काटा  title=
Crowd sings in unison as Scottish singer Lewis Capaldi struggles to complete his set at Glastonbury Festival

Trending Video : एखाद्या कलाकारासाठी चाहते किती महत्त्वाचे असतात हे तो कलाकारही शब्दांत मांडू शकत नाही. कारण, हे एक असं नातं असतं जे शब्दांत मांडताही येत नाही आणि त्याच्याबद्दल व्यक्तही होता येत नाही. अमर्याद प्रेमाच्या या नात्याची सुरेख झलक नुकतीच पाहायला मिळाली ती एका गायकाच्या कॉन्सर्टमध्ये. जिथं त्याला अडचणीत आलेलं पाहताच हजारोंच्या संख्येनं समोर असणाऱ्या चाहत्यांनी तो कॉन्सर्ट पुढे नेला आणि त्याची अनोखी साध दिली. हा क्षण इतका भावनिक आणि भारावणारा होता की, चाहत्यांचा पाठिंबा पाहून तो गायकही भावूक झाला. 

सोशल मीडियावर या क्षणांचा एक व्हिडीओ कमालीला व्हायरल होत असून, त्यामधील प्रत्येक दृश्य पाहताना अंगावर काटाच येतोय. नुकत्यात पार पडलेल्या Glastonbury Festival दरम्यानच्या एका कॉन्सर्टमध्ये Lewis Capaldi नं त्याची सुरेख गाणी सादर केली. पण, कार्यक्रमाच्या सांगतेपर्यंत पोहोचलं असता त्याला शेवटचं गाणं गाताना काही अडचणी आल्या, व्यासपीठावर असतानाच त्याचा आवाज गेला आणि हे पाहून चाहत्यानी त्या क्षणापासून एका सुरात ते गाणं उचलून धरलं आणि पूर्णही केलं. 

सुरुवात त्यानं केली आणि शेवट चाहत्यांनी... 

Lewis चं ‘Someone You Love’ हे गाणं बँडनं वाजवण्यास सुरुवात केली. त्यानं गायलाही सुरवातही केली. पण, काही कळायच्या आतच त्याचा आवाज थांबला. बस्स, त्याच्याकडे पाहताच काहीरी बिनसल्याचा अंदाज चाहत्यांना आला आणि त्यांनी त्याला धीर देत गाणं गायला सुरुवात केली. 

Lewis ला Tourette syndrome नावाचा एक आजार असून, त्यानं कायमच या आजारपणाची कल्पना चाहत्यांना दिली आहे. याबाबत तो सातत्यानं काही गोष्टी स्पष्टही करत आला. यावेळी त्याच्या आजाराचं गांभीर्य चाहत्यांनी प्रत्यक्ष पाहिलं आणि त्याला धीर दिला. आपल्याला मिळणारा हा पाठिंबा पाहता त्यानं सर्वांनाचेच मनापासून आभार मानले. त्यानंच नव्हे, तर त्याच्या बँडमधील प्रत्येक सदस्यानं चाहत्यांच्या या पाठिंब्यासाठी त्याचे आभार मानले. 

हेसुद्धा वाचा : जगातील शांत देशांच्या यादीत कोणी मारली बाजी? भारत शेवटून आघाडीवर 

 

आजारपणामुळं गेल्या काही काळापासून  #LewisCapaldi कार्यक्रम करताना दिसला नव्हता. आरामानंतर ज्यावेळी तो समोर आला तेव्हाही तो या आजाराशी झुंज देताना दिसला. येत्या काळात तो या आजारावर नक्कीच मात करेल. अर्थात यासाठी तो वैद्यकिय मदतही घेत आहे. पण, चाहत्यांकडून मिळणारी सकारात्मकता आणि त्यांची साथही या प्रवासात त्याला तितकीच महत्त्वाची आहे हे मात्र खरं.