लाल बहादूर शास्त्रींच्या आयुष्यावर येणार चित्रपट

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींच्या आयुष्यावर एक चित्रपट बनवणार आहेत.

Updated: Oct 2, 2017, 08:15 PM IST
लाल बहादूर शास्त्रींच्या आयुष्यावर येणार चित्रपट  title=

मुंबई : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींच्या आयुष्यावर एक चित्रपट बनवणार आहेत. या चित्रपटामध्ये शास्त्रींची भूमिका कोण करणार याबाबतचा निर्णय अजूनही झालेला नाही. या चित्रपटासाठीच्या कलाकारांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी शास्त्रींच्या ११३व्या जयंतीनिमित्त चित्रपटाबाबत ट्विटरवरून नवीन माहिती शेअर केली आहे. याच दिवशी देशातल्या सगळ्यात इमानदार, यशस्वी आणि लोकप्रिय नेते लाल बहादूर शास्त्रींचा जन्म झाला होता. ताश्कंदमध्ये झालेल्या शास्त्रींच्या रहस्यपूर्ण मृत्यूवर आम्ही चित्रपट बनवत आहोत. कलाकारांच्या निवडीला सुरुवात झाली आहे, असं ट्विट विवेक अग्निहोत्रीनं केलं आहे.

लाल बहादूर शास्त्रींचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ साली उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये झाला होता. ११ जानेवारी १९६६ साली ताश्कंदमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्याच दिवशी शास्त्रींनी ताश्कंद करारावर स्वाक्षरी केली होती. शास्त्री हे मृत्यूनंतर भारतरत्न मिळणारे पहिले व्यक्ती होते.