'सेक्रेड गेम्स', 'मिर्झापूर'पेक्षाही प्रेक्षकांना भावतंय 'पाताल लोक'

अभिनेत्री अनुष्का शर्मा ......

Updated: May 15, 2020, 02:01 PM IST
'सेक्रेड गेम्स', 'मिर्झापूर'पेक्षाही प्रेक्षकांना भावतंय 'पाताल लोक' title=

मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये चित्रपट व्यवसायाला टक्कर देत आहे ते म्हणजे ऑनलाईन स्ट्रीमिंग ऍपचं विश्व. अतिशय विस्तीर्ण आणि तितक्याच कलात्मक अशा या विश्वात आता एका नव्या कलाकृतीची चर्चा सुरु आहे. सातत्याने विविध विषयांना तितक्याच प्रभावीपणे हाताळणाऱ्या काही अफलातून मंडळींच्या योगदानातून साकारलेल्या या नवख्या कलाकृतीचं नाव आहे, 'पाताल लोक'.

अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या क्लीन स्लेट फिल्म्स या निर्मिती संस्थेअंतर्गत पाताल लोक हा अफलातून वेब शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ऍमेझॉ़न प्राईमवर प्रदर्शित होणाऱ्या या वेब शोला प्रेक्षकांची अशी काही पसंती मिळत आहे, की त्यांना चक्क सेक्रेड गेम्स आणि मिर्झापूर या अतिशय गाजलेल्या वेब सीरिजचाही विसर पडला आहे. 

सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना नेटकऱ्यांनी या पाताल लोकविषयी भरभरुन लिहिलं. बऱ्याच काळासाठी एका ठिकाणी न टीकणाऱ्या प्रेक्षकांनाही हा शो खिळवून ठेवत असल्याची प्रतिक्रियाही नेटकऱ्यांनी दिली आहे. जी पाहता, खरंच 'पाताल लोक'ने एका अर्थी 'सेक्रेड गेम्स' आणि 'मिर्झापूर'ला पिछाडीवर टाकलं असंच म्हणावं लागेल. 

पाहा : ...म्हणून फळांच्या राजाला सोनालीचा रामराम 

 

नीरज काबी, गुल पनाग, जयदीप अहलावत, अभिषेक बॅनर्जी, स्वस्तिका मुखर्जी यांच्या या वेब शोमध्ये मुख्य भूमिका आहेत. सुदीप शर्माच्या लेखणीतून हे 'पाताल लोक' साकारण्यात आलं आहे.