बापरे...! दीपिका पदुकोणच्या शरीरावर हे कसले डाग; पाहून चाहत्यांना धक्का

सोशल मीडियावर दीपिका पादुकोणचा लेटेस्ट फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये तिच्या शरीरावरील काही डाग दिसत आहेत. तिची अशी अवस्था पाहून चाहते सध्या चिंतेत आहेत.

Updated: Apr 13, 2024, 01:16 PM IST
बापरे...! दीपिका पदुकोणच्या शरीरावर हे कसले डाग; पाहून चाहत्यांना धक्का title=

मुंबई : ओम शांती ओममधून हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवणारी अभिनेत्री दीपिका पादुकोणला कोणत्याच वेगळ्या ओळखीची गरज नाही. सध्या दीपिका तिच्या प्रेग्नंसीचा आनंद घेत आहे. प्रेग्नंट असल्यामुळे दीपिका एक्टिंगच्या दुनियेपासून लांब आहे. सध्या दीपिकाचा एक असा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.

यादरम्यान सोशल मीडियावर दीपिका पादुकोणचा लेटेस्ट फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये तिच्या बॅक स्कीनवर टॅनिंगचे डाग स्पष्ट दिसत आहेत. सध्या दीपिका या फोटोमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

टॅनिंगची शिकार झाली दीपिका पादुकोण
सध्या गर्मीचा सीझन सुरु आहे. त्यामुळे उन्हाळ्यात स्कीनवर टॅनिंग होणं ही कॉमन गोष्ट आहे. त्यामुळे बॉडीचा रंग काळा पडतो. तसंच काहीसं दीपिका पदुकोणसोबत घडलं आहे. शुक्रवारी दीपिका पदुकोणचा पती आणि बॉलिवूड अभिनेता सुपरस्टार रणवीर सिंहने अभिनेत्रीचा लेटेस्ट फोटो क्लिक केला. जो स्वत: अभिनेत्री तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे आहे. सध्या दीपिकाचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या फोटोत आपण पाहू शकतो की, दीपिका पादुकोणच्या पाठीवरचे टॅनिंगचे मार्क्स स्पष्टपणे दिसत आहेत. यामुळे हा अंदाज लावला जाऊ शकतो की, सुरु असलेल्या उन्हामुळे दीपिकाच्या स्कीनची ही अशी हालत झाली आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याचबरोबर तिचा हा फोटो पाहून चाहते विविध सल्ले देताना दिसत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लवकरच आई बनणार दीपिका पादुकोण 
काही महिन्यांआधी दीपिकाने सोशल मीडियाच्या माध्यामातून ती आई होणार असल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. दीपिकाच्या पोस्टवर आधारित, यावर्षी सप्टेंबर महिन्यात तिच्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे. 

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, दीपिका क्लंकी 2898 या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत ऊथचा सुपरस्टार प्रभास झळकणार आहे. त्याचबरोबर पहिल्यांदाच  प्रभास आणि दीपिका एकमेकांसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. या जोडीला एकत्र पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत.