.. यामुळे 'संजू' बाबा स्वतःच्याच बायोपिकच्या स्क्रिनिंगला पोहोचला नाही?

हे आहे खरं कारण?

.. यामुळे 'संजू' बाबा स्वतःच्याच बायोपिकच्या स्क्रिनिंगला पोहोचला नाही?  title=

मुंबई : या शुक्रवारी संजय दत्तच्या जीवनावर आधारित बायोपिक 'संजू' हा सिनेमा रिलिज झाला आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा भरपूर कमाई करत आहे. या सिनेमाची सध्या सगळीकडे भरपूर चर्चा होत आहे. या सिनेमाने अगदी पहिल्या दोन दिवसांतच रेकॉर्ड तोडले आहे. गुरूवारी बॉलिवूडमधील खास कलाकारांसाठी स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. तेव्हा आमीर खानसोबत अनेक कलाकार उपस्थित होते. मात्र स्वतः अभिनेता संजय दत्त उपस्थित राहू शकलेला नाही. 

का उशिला गेला संजय दत्त ? 

गुरूवारी स्क्रिनिंग झालेल्या ठिकाणी स्वतः संजय दत्त लेट आला होता. याचं कारण असं की, स्क्रिनिंगनंतरही संजय दत्त दिसला नाही म्हणून अनेक कलाकार हैराण झाले. मग आमीर खान सारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी सिनेमा दिग्दर्शक राजकुमार हिरानी याला संजय दत्तला बोलावण्यास सांगितलं. राजकुमार हिरानी यांनी रिक्वेस्ट केल्यामुळे संजय दत्त स्क्रिनिंग संपताना आला. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या कलाकारांनी संजय दत्तचं उभं राहून स्वागत केलं. 

संजय दत्तची बायोपिक संजू ही या वर्षाची सर्वात पहिल्यापासूनच अधिक कमाई करणारी फिल्म आहे. शुक्रवारी ओपनिंग झालेल्या दिवशी या सिनेमाने 34.75 करोड रुपये कमाई केली आहे. 3 दिवसांत हा सिनेमा 100 करोड रुपये कमाई करेल अशी आशा आहे.