कॅन्सर दिनानिमित्त प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची पत्नीसाठी खास पोस्ट

World Cancer Day: बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराना याने बायकोसाठी खास पोस्ट करत सर्वांचे या विषयाकडे लक्ष वेधले आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 4, 2024, 02:51 PM IST
कॅन्सर दिनानिमित्त प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची पत्नीसाठी खास पोस्ट  title=
World Cancer Day

World Cancer Day: 4 फेब्रुवारी हा वर्ल्ड कॅन्सर डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अनेकजण कॅन्सरबद्द जनजागृती करतात. कॅन्सर हा जीवघेणा आजार आहे. कॅन्सर झाल्याचे कळताच अनेकांना आपलं आयुष्यच संपलंय असं वाटू लागतं. पण यावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. त्यांच्या कहाण्या रुग्णांपर्यंत पोहोचायला हव्यात. बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराना याने बायकोसाठी खास पोस्ट करत सर्वांचे या विषयाकडे लक्ष वेधले आहे. 

आयुष्यमान खुराना आणि ताहिरा कश्यप हे सर्वांचे आवडते कपल आहे. दोघांचं प्रेम कॉलेज वयापासून सुरु झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, त्याला 15 वर्षे होत आली आहेत. 2019 मध्ये हे कपल एका मोठ्या संकटातून गेलं. ताहिराला स्टेज 0 ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे समजले आणि दोघांच्याही पायाखालची वाळूच सरकली. यानंतर तिची मास्टेक्टॉमी प्रक्रिया झाली. आता ताहिरा बरी झाली आहे. दरम्यान आयुष्यमान खुरानाने पत्नीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. 

आयुष्यमानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ताहिराचा फोटो शेअर केलाय. पहिल्या फोटोत दोघांचा सेल्फीवाला फोटा आहे. दुसऱ्या फोटोत ताहिराचे सर्जरीचे निशाण दिसत आहे. तिसऱ्या आणि चौथ्या फोटोत ताहिरा दिसत आहे. या फोटोसोबत आयुष्यमानने एक पोस्ट लिहिली आहे. आपल्या पत्नीने कॅन्सरवर मात केल्याने यात तो तिचं कौतुक करताना दिसतोय. ती मुलगी जिला मी पंजाब विद्यापीठात झोपडी नंबर 14 मध्ये समोसा आणि चहा पिताना पाहिलंय. तुझ्या हृदय आणि आत्म्याशी प्रेम ताहिरा कश्यप! हॅशटॅग वर्ल्ड कॅन्सर डे, अशी पोस्ट त्याने लिहिली.

कॅन्सरवर स्पष्टपणे बोलते ताहिरा 

ताहिरा कश्यम कॅन्सरवर स्पष्टपणे भूमिका मांडताना दिसते. मी कधीच आपल्या शरीम, डोक आणि आत्म्याला एकसमान मानलं नाही. शारिरीत स्वास्थ्य गरजेचं असतं पण मानसिक काही नसतं, असा मला वाटायचं. मी खूप व्यायाम केला. पण कॅन्सर त्या नकारात्मकतेचं प्रकटीकरण होतं, ज्याला मी पोसत होती, असे ताहिरा सांगते. 

कोण्या एकाकडे जाण्याऐवडी मी रात्रभर रडणे पसंत केले. मी दुहेरी आयुष्य जगत होते. माझा पती शूटींग करत होता आणि मी रात्र रात्र रडून काढत होती. माझ्या मुलांसमोर हरलेली दिसू नये म्हणून सकाळी एका आनंदी व्यक्तीची भूमिका बजावायची, असेही ती म्हणाली.