अनुष्काला साकारायचीय मनीषा कोइरालाची भूमिका

बॉलिवूडमध्ये सध्या रिमेक आणि बायोपीक बनविण्याचा ट्रेण्ड सुरू आहे. यात केवळ इतर भाषांमधल्या चित्रपटांचे किंवा राजकीय नेते आणि खेळाडूच नव्हे तर, आता चित्रपट अभिनेते, अभिनेत्रींवरही चित्रपट बनिवण्याचा ट्रेण्ड सुरू आहे. त्यामुळे अलिकडे स्वत: कलाकारही मला अशा प्रकारची भूमिका साकारायची आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करू लागले आहेत.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 29, 2017, 10:25 PM IST
अनुष्काला साकारायचीय मनीषा कोइरालाची भूमिका title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या रिमेक आणि बायोपीक बनविण्याचा ट्रेण्ड सुरू आहे. यात केवळ इतर भाषांमधल्या चित्रपटांचे किंवा राजकीय नेते आणि खेळाडूच नव्हे तर, आता चित्रपट अभिनेते, अभिनेत्रींवरही चित्रपट बनिवण्याचा ट्रेण्ड सुरू आहे. त्यामुळे अलिकडे स्वत: कलाकारही मला अशा प्रकारची भूमिका साकारायची आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करू लागले आहेत.

अनुष्का म्हणते...

दरम्यान, सध्याची चर्चीत अभिनेत्री अनुष्का शर्मानेही आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. आपल्याला अभिनेत्री मनिषा कोइरालाची भूमिका साकारायची आहे, अशी इच्छा व्यक्त केल्याचे वृत्त आहे. मनीषाने केलेल्या मणिरत्नमच्या 'दिल से' चित्रपटतील भूमिकेची तेव्हा खूपच चर्चा झाली होती. सूत्रांकडील माहिती अशी की, अनुष्काला मनीषाचा हा चित्रपट आणि त्यातील भूमिका प्रचंड आवडते. त्यामुळे ही व्यक्तिरेखा ती पुन्हा एकदा पडद्यावर साकारू इच्छिते.

अनुष्का सध्या काय करते?

दरम्या, अनुष्का सध्या आनंद एल. रायच्या चित्रपटात व्यग्र आहे. ज्यात ती शाहरूख आणि कॅतरीना कैफ सोबत दिसणार आहे. अनुष्काचा शाहरूकसोबतचा एक सिनेमा यापूर्वी फ्लॉप झाला आहे. यापूर्वी ती शाहरूखसोबत 'जब हैरी मेट सेजल'मध्ये दिसली होती. दरम्यान, व्यक्तिगत आयुष्याबाबत बोलायचे तर, अनुष्का सध्या विराटसोबतच्या नाजूक नात्यामुळे चांगलीच चर्तेत आहे. 

मनीषा कोइरालाचे काही चित्रपट

मुंबई एक्स्प्रेस,1942: ए लव स्टोरी, इन्सानियत के देवत, य़ल्गार, सौदागर, मिलन, दुश्मनी, अनोखा अंदाज़, यूंही कभी, लाल बादशाह, कच्चे धागे, काडतूस, जय हिंद, लावारिस, मन, ताजमहल, कंपनी, जानी दुश्मन, लज्जा, चैम्पियन, खौफ़, बाग़ी