झी टॉकीजच्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?

झी एंटरटेनमेंट एन्टरप्रायजेस लिमिटेडची एकमेव मराठी चित्रपट वाहिनी झी टॉकीज प्रस्तुत सर्वांच्या लाडक्या आणि प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहतात अशा महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण २०१७ या पुरस्कार सोहळ्याचे नामांकन घोषित करण्यात आले आहे.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 29, 2017, 05:08 PM IST
झी टॉकीजच्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?  title=

मुंबई : झी एंटरटेनमेंट एन्टरप्रायजेस लिमिटेडची एकमेव मराठी चित्रपट वाहिनी झी टॉकीज प्रस्तुत सर्वांच्या लाडक्या आणि प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहतात अशा महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण २०१७ या पुरस्कार सोहळ्याचे नामांकन घोषित करण्यात आले आहे.

झी टॉकीज प्रस्तुत महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण हे मराठी सिनेसृष्टीतील एकमेव व्युव्हर्स चॉईस अवॉर्ड्स आहेत. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण हे पुरस्कार आठव्या वर्षात पदार्पण करत असून, या पुरस्कारांनी नेहमीच नवोदित कलाकार आणि त्याच्या टॅलेंटला वाव दिली आहे. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्कारांसाठी १४ विभागात नामांकन जाहीर झालं असून, ‘फेव्हरेट चित्रपट’, ‘फेव्हरेट अभिनेता’, ‘फेव्हरेट अभिनेत्री’, ‘फेव्हरेट स्टाईल आयकॉन’, ‘फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर’ ‘फेव्हरेट गीत’ या प्रसिद्ध विभागात कमालीची टक्कर असणार आहे. मराठी चित्रपट चाहते आजपासून या अद्भुत पुरस्कार सोहळ्यात आपल्या लाडक्या कलाकारांना पुरस्कृत करण्यासाठी आपले ३१ डिसेंबरपर्यंत मत नोंदवू शकतात.

‘फेव्हरेट चित्रपट’ या विभागात वेगवेगळ्या शैलीचे तसेच समीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळालेल्या चित्रपटांचा समावेश आहे. या पुरस्कारासाठी फास्टर फेणे, व्हेंटिलेटर, ती सध्या काय करते, बॉईज, ची व ची सौ का आणि मुरंबा  या चित्रपटांमध्ये चुरशीचा सामना रंगणार आहे. २०१७ मध्ये आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या कलारांचा फेव्हरेट अभिनेता आणि फेव्हरेट अभिनेत्री या विभागात समावेश करण्यात आला आहे. फास्टर फेणे आणि मुरंबा या चित्रपटातील अप्रतिम अभिनयासाठी अमेय वाघ याने फेव्हरेट अभिनेता या विभागात २ नामांकनं पटकावली आहेत. त्याचबरोबर व्हेंटिलेटर चित्रपटातील कमाल अभिनयासाठी जितेंद्र जोशी, ती सध्या काय करते मधील सहज सादरीकरणासाठी अंकुश चौधरी, ची व ची सौ का मधील सोलरपुत्राच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ललित प्रभाकर आणि बॉईज चित्रपटात प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यासाठी पार्थ भालेराव यांनी विभागात नामांकनं पटकावली आहेत. 

फेव्हरेट अभिनेत्री या विभागात बोल्ड अँड ब्युटीफुल सई ताम्हणकर हिने जाऊंद्याना बाळासाहेब मधील सादर केलेली गावरान मुलगी नामांकनं पटकावून गेलीय, तसेच मुक्ता बर्वे हिच्या हृदयांतर मधील प्रेरक कलाकृती, सोनाली कुलकर्णी हिची कच्चा लिंबू मधील अफलातून कामगिरी, पर्ण पेठे हिचा फास्टर फेणेमधील उत्कृष्ट अभिनय, ची व ची सौ का मधील मृण्मयीने सादर केलेली व्हेज कन्या आणि मुरंबा मधील गोड मिथिला पालकर यांनी देखील या विभागात नामांकनं पटकावली आहे. 

फेव्हरेट गीत या विभागात जाऊंद्याना बाळासाहेब मधील ब्रिन्ग इट ऑन आणि डॉल्बी वाल्या, बॉईज चित्रपटातील लग्नाळू, ती सध्या काय करते या चित्रपाटातील  हृदयात वाजे समथिंग तसेच व्हेंटिलेटर मधील या रे या आणि बाबा या गाण्यांचा समावेश आहे. 
तरुणींच्या काळजाचा ठाव घेणारे मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते अंकुश चौधरी, आकाश ठोसर, अमेय वाघ, ललित प्रभाकर, वैभव तत्ववादी, गश्मीर महाजनी, अभिनय बेर्डे आणि स्वप्नील जोशी यांनी महाराष्ट्राचा फेव्हरेट स्टाईल आयकॉन या विभागात नामांकन पटकावलं आहे. तसेच सिनेसृष्टीतील स्वप्नसुंदरी अभिनेत्री सई ताम्हणकर, मिथिला पालकर, अमृता खानविलकर, पूजा सावंत, पर्ण पेठे, स्पृहा जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रिया बापट यांनी फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर या विभागात नामांकन पटकावले आहे. 

या विभागांव्यतिरिक्त खालील ८ विभागातील आवडत्या कलाकारांसाठी देखील प्रेक्षक आपले मत नोंदवू शकतात.

नामनिर्देशितव्यक्ती

चित्रपट

फेव्हरेटदिर्ग्दर्शक

आदित्यसरपोतदार

फास्टरफेणे

राजेशमापुसकर

व्हेंटिलेटर

सतीशराजवाडे

तीसध्याकायकरते

विशालदेवरूखकर

बॉईज

परेशमोकाशी

चीवचीसौका

वरुणनार्वेकर

मुरंबा

फेव्हरेटसहाय्यकअभिनेता

आशुतोषगोवारीकर             

व्हेंटिलेटर

दिलीपप्रभावळकर               

फास्टरफेणे

सिद्धार्थजाधव       

फास्टरफेणे

सचिनखेडेकर      

मुरंबा

भाऊकदम            

जाऊंद्यानाबाळासाहेब

पुष्करराजचिरपुटकर          

बापजन्म

फेव्हरेटसहाय्यकअभिनेत्री

नम्रताआवटे

व्हेंटिलेटर

सईताम्हणकर

फॅमिलीकट्टा

शिल्पातुळसकर

बॉईज

रीमा

जाऊंद्यानाबाळासाहेब

सुकन्याकुलकर्णी  

व्हेंटिलेटर

चिन्मयीसुमीत

मुरंबा

फेव्हरेटनवोदितअभिनेता

अभिनयबेर्डे

तीसध्याकायकरते

ललितप्रभाकर

चीवचीसौका

सुमेधमुद्गलकर

व्हेंटिलेटर | मांजा

रवीजाधव

कच्चालिंबू

फेव्हरेटनवोदितअभिनेत्री

आर्याआंबेकर

तीसध्याकायकरते

मिथिलापालकर

मुरंबा

ऋचाइनामदार

भिकारी

फेव्हरेटखलनायक

गिरीशकुलकर्णी

फास्टरफेणे

झाकीरहुसेन

बॉईज

हेमंतढोमे

बघतोसकायमुजराकर

किरणकरमरकर

कान्हा

फेव्हरेटगायकआणिगायिका

नागेशमोर्वेकरआणिअर्लडिसुझा

डॉल्बीवाल्या (जाऊंद्यानाबाळासाहेब)

अजयगोगावले      

ब्रिन्गइटऑन (जाऊंद्यानाबाळासाहेब)

रोहनप्रधान

यारेयाआणि (व्हेंटिलेटर)

रोहनप्रधानआणिप्रियांकाचोप्रा

बाबा (व्हेंटिलेटर)

कौस्तुभगायकवाडआणिजनार्धनखंडाळकर

लग्नाळू (बॉईज)

रितेशदेशमुख

फाफेसॉंग(फास्टरफेणे)

विधीतपाटणकरआणिआर्याआंबेकर

हृदयातवाजेसमथिंग(तीसध्याकायकरते)

आर्याआंबेकर       

जराजरा (तीसध्याकायकरते)