या ३ उपायांनी केस लवकर वाढतील!

लांबसडक केसांची क्रेझ आजकालच्या तरुणींमध्ये दिसून येते.

Updated: Mar 10, 2018, 10:25 AM IST
या ३ उपायांनी केस लवकर वाढतील! title=

मुंबई : लांबसडक केसांची क्रेझ आजकालच्या तरुणींमध्ये दिसून येते. लांबसडक, रेशमी केस सौंदर्यात भर पाडतात. त्याचबरोबर केसांची वेगवेगळी स्टायलिंग करणे शक्य होते. ते मोकळे जरी सोडले तरी फार सुंदर दिसतात. पण काही मुलींचे केस लवकर वाढतात तर काहींना केस वाढायला थोडा वेळ लागतो. अशा मुलींसाठी हे ५ उपाय... यामुळे लवकरात लवकर तुम्ही लांब केसांचा अनुभव घेऊ शकता.

अंड

अंड्याचा सफेद भाग केसांच्या मुळापासून टोकापर्यंत लावा. तासभरानंतर केस थंड पाण्याने स्वच्छ धुवा. अंड्यातून केसांना आवश्यक प्रोटीन मिळेल आणि केस पटापट वाढतील.

थंड पाणी

केस थंड पाण्याने धुणे फायदेशीर ठरेल. थंड पाण्यामुळे केसांजवळील रक्तप्रवाह सुधारतो आणि केस वाढीस चालना मिळते. त्याचबरोबर केसांची नैसर्गिक चमक टिकून राहते.

कोरफड जेल

कोरफड बहुगुणी असून केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे. कोरफड मधून चिरून त्याचा आतील गर केसांना लावा. तासाभराने केस धुवा आणि मुलायम, चमकदार केसांचा अनुभव घ्या.