या ५ प्रकारे नेलपॉलिश नखांसाठी ठरते नुकसानकारक!

अनेक मुलींना सतत नेलपॉलिश लावण्याची सवय असते.

Updated: May 19, 2018, 10:33 AM IST
या ५ प्रकारे नेलपॉलिश नखांसाठी ठरते नुकसानकारक! title=

मुंबई : अनेक मुलींना सतत नेलपॉलिश लावण्याची सवय असते. पण ती सवय नखांसाठी नुकसानकारक ठरु शकते. सतत नेलपॉलिश काढणे, लावणे यामुळे नखांचे नुकसान होते. पाहुया कसे ते...

#1. नेहमी नेलपॉलिश लावल्याने नखं कमकूवत होऊन तुटू लागतात. त्यामुळे काही दिवसांसाठी नेलपॉलिश लावू नका. १०-१५ मिनिटे नखं कोमट पाण्यात बुडवून ठेवा. त्यामुळे हात व नखं हायड्रेट राहतील.

#2. अॅसिटोन असलेल्या रिमूव्हरचा वापर नखांना नुकसान पोहचवतो. वारंवार त्याचा वापर केल्याने नखातील नैसर्गिक ऑईल आणि शाईन निघून जाते. त्याचबरोबर नखांच्या आजूबाजूची त्वचा ड्राय होते.

#3. नेलपॉलिश लावल्यानंतर काही दिवसांनी ती थोडीशी निघते. मग नखांनी काढण्याचा उद्योग सुरू होतो. त्यामुळे नखांच्या वरील सुरक्षा आवरण निघून जाते व त्यामुळे नखे कमजोर होतात.

#4. नेलपॉलिश लावण्यापूर्वी नखांवर बेस कोट न लावल्याने नखे पिवळी पडतात. त्यामुळे बेस कोट लावणे गरजेचे आहे.

#5. हलक्या प्रतीचे नेलपॉलिश वापरणे ही नखांना नुकसना पोहचवते. हलक्या प्रतीच्या नेलपॉलिशमध्ये केमिकल्स असतात त्यामुळे नखे कोरडी पडतात. त्यामुळे केमिकल्स कमी असलेल्या नेलपॉलिश वापरा. बाजारात व्हिटॉमिन असलेलीही नेलपॉलिश उपलब्ध आहे. त्यामुळे नखांचे पोषण होईल आणि नखं हेल्दी राहतील.