Astrology: कोणत्या ग्लासमध्ये पाणी पिल्याने काय होईल परिणाम? आरोग्यच नाही संपत्तीवरही प्रभाव

आपण दिवसात अनेकवेळा पाणी पित असतो. शरीरात पाण्याचे प्रमाण भरपूर असते. चांगल्या आरोग्यासाठी पाणी पिण्याची योग्य पद्धतदेखील महत्वाची ठरते

Updated: Jul 25, 2021, 01:23 PM IST
Astrology: कोणत्या ग्लासमध्ये पाणी पिल्याने काय होईल परिणाम? आरोग्यच नाही संपत्तीवरही प्रभाव title=

नवी दिल्ली : आपण दिवसात अनेकवेळा पाणी पित असतो. शरीरात पाण्याचे प्रमाण भरपूर असते. चांगल्या आरोग्यासाठी पाणी पिण्याची योग्य पद्धतदेखील महत्वाची ठरते. त्याचा संबध ज्योतिषशास्त्राशीही आहे. जी व्यक्ती धातु पासून बनवलेल्या ग्लासात पाणी पिते त्याचा प्रभाव त्याच्या जिवनावर, तब्बेतीवर तसेच आर्थिक स्थितीवर सुद्धा होतो. आज आपण जाणून घेऊ या की, कशाप्रकारच्या ग्लासमध्ये पाणी पिल्याने काय फायदा होतो.

पाण्याचा ग्लास आणि त्यामुळे होणारा परिणाम
चांदीचा ग्लास

 चांदीला सर्वात शुद्ध धातुंपैकी एक मानले गेले आहे. घरात चांदीचे भांडे असणे आणि त्यात जेवण करणे घरात सुख समृद्धी वाढवते. यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. चांदीचा ग्लास नसल्यास एखाद्या ग्लासात चांदीची अंगठी टाकून पाणी पिल्यास आर्थिक चणचण दूर होते. लक्षात ठेवा असं करण्याआधी अंगठी स्वच्छ करून घ्या.

तांब्याचा ग्लास 
या ग्लासमध्ये पाणी पिल्याने आरोग्यासाठी खूप चांगले असते. त्यामुळे शरीरातील दूषित पदार्थ सहजच बाहेर पडतात. ब्लडप्रेशर कन्ट्रोलमध्ये राहते. तसेच पोटाच्या समस्या होत नाहीत. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी थंड राहते. 

पितळाचा ग्लास 
पितळ देखील चांगला धातु मानला जातो. जेवण करण्यासाठी तसेच पाणी पिण्यासाठी पितळाच्या भांड्यांचा उपयोग केल्यास इम्युनिटी चांगली राहते.  ज्या लोकांच्या राशीत गुरू कमजोर असेल, त्यांनी जेवण तसेच पाणी पिण्यासाठी पितळाच्या भांड्यांचा उपयोग करायला हवा.

स्टीलचा ग्लास 
स्टीलच्या ग्लासला लोह मानले जाते. हा धातु शनिशी संबधीत आहे. स्टीलच्या ग्लासात पाणी पिल्याने फायदा तर नाही होत, परंतु गरम पाणी पिल्याने नुकसान होते.

प्लास्टिक किंवा काचेचा ग्लास 
प्लास्टिक ग्लासातून पाणी पिऊ नये. तसेच या ग्लासातून गरम पाणी पिणे देखील आरोग्याला घातक असते. काचेच्या ग्लासातून पाणी पिऊ शकता. परंतु त्याने आरोग्याला फायदा होत नाही.