Horse Gram: चरबी मेणासारखी वितळवतं 'हे' सुपरफूड, कोलेस्ट्रॉल-डायबिटीस ठेवतो नियंत्रणात

Horse Gram Benefits: बरेच पदार्थ आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानले जातात, पण आज आम्ही तुम्हाला असे एक सुपरफूड (Superfood) सांगणार आहोत जे आरोग्यासाठी तर उत्तम आहेच सोबतच बऱ्याचशा आजारांवरही रामबाण उपाय आहे.  

Updated: Oct 27, 2022, 10:50 AM IST
Horse Gram: चरबी मेणासारखी वितळवतं 'हे' सुपरफूड, कोलेस्ट्रॉल-डायबिटीस ठेवतो नियंत्रणात title=
benefits of Horse Gram in cholesterol control

Horse Gram Benefits: आपल्या रोजच्या आहारात चणे, मुग, उडिद हे पदार्थ आपण प्रामुख्याने वापरतो. पण, यातही अनेकदा काही पदार्थांकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि नेमके तेच आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर असतात. या यादीत कुळीथचा ( Horse Gram ) समावेश आहे. कुळीथ प्रोटीन (Protine), विटामिन (Viramin) आणि फायबरचा (Fiber) स्त्रोत आहे, याला आपण आपल्या डाएटमध्येसुद्धा समाविष्ट करू शकतो. (benefits of Horse Gram in cholesterol control)

कुळीथ डाळ वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. यातील पोषक तत्व भुकेवर नियंत्रण मिळवतात ज्याने भुक कमी लागते आणि वजन कमी करण्यास मदत होते. कुळीथ किंवा हुलग्यांमध्ये कॅलरीज (Calories) कमी आणि प्रोटीन जास्त प्रमाणात असतात. ही डाळ खाल्याने शरीरातील चयापचय क्रिया सुधारते. 

कुळिथामुळे इतरही बरेच फायदे होतात. हे किडनी स्टोनवरही (Kidney Stone) प्रभावी आहे. त्याच्या सेवनाने मुतखड्यासारख्या समस्या दूर होतात, कुळीथ मुत्रवर्धक असल्याने यूरीनच्या माध्यमातून हानिकारक पदार्थ आणि किडनी स्टोन शरीराबाहेर पडण्यास मदत होते.

अधिक वाचा : दिवसाची सुरुवातच White Bread खाऊन करताय? दुष्परिणाम वाचून ही सवयच मोडाल 

कुळीथ हृदयासाठीसुद्धा (Heart) खुप उपयुक्त आहे. शरीरातील वाईट कॉलेस्ट्रॉल (Cholesterol) कमी करून चांगले कॉलेस्ट्रॉल वाढवण्यास याची मदत होते. शिवाय हृदयासंबधित आजार कमी होतात. 

कुळीथामध्ये फायबर (Fiber) असल्यामुळे, यात असणारे पोषकतत्व रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. ज्यामुळे शरीरातील साखरेचं (Sugar) प्रमाण नियंत्रणात राहतं.