दिवसाची सुरुवातच White Bread खाऊन करताय? दुष्परिणाम वाचून ही सवयच मोडाल

रक्त धमन्यांमधून हृदयापर्यंत पोहोचण्यास विलंब लागतो आणि.... 

Updated: Oct 27, 2022, 09:19 AM IST
दिवसाची सुरुवातच White Bread खाऊन करताय? दुष्परिणाम वाचून ही सवयच मोडाल  title=
White Bread disadvantages and side effects

Disadvantages of Eating White Bread: ब्रेड मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत गरम करून मग त्यावर बटर किंवा तूप- साखर लावून तो खाण्यानं अनेकांच्याचच वीकेंडची किंवा मग काहींच्या तर दर दिवसाची सुरुवात होते. सँडविच (Sanwich) म्हणू नका किंवा मग ब्रेड पकोडा, यामध्येही हा व्हाईट ब्रेड सर्रास वापरला जातो. काहींसाठी हाच White Bread रोजचा डब्बा असतो. पण, नकळतच हीच सतत व्हाईट ब्रेड खाण्याची सवय तुमच्या शरीरासाठी मात्र चांगली नाही हे लक्षात येतंय का? (White Bread disadvantages and side effects)

मीठाचं (Salt) जास्त प्रमाण - बहुतांश व्हाईट ब्रेड्समध्ये मीठ आणि प्रिझर्वेटीव्हजचं प्रमाण जास्त असतं. पुढचे काही दिवस हे पदार्थ टिकून राहावेत यासाठीचाच हा प्रयत्न असतो. पण, शरीरासाठी मात्र हे अजिबातच योग्य नाही. व्हाईट ब्रेडमध्ये मीठाचं प्रमाण जास्त असल्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास सतावतो. 

अधिक वाचा : अन्न नीट पचत नाहीये? तुमचं शरीर देतंय तुम्हाला हे 3 संकेत

 

वजन वाढतं- व्हाइट ब्रेडमध्ये कार्बोहायड्रेट, रिफाईंड शुगर (Rafind sugar) आणि मीठाचं प्रमाण जास्त असल्यामुळं शरीराचं नुकसान होतं. रोजच्या रोज ब्रेड खाणाऱ्यांच्या शरीरात सारखरेतं प्रमाण वाढून चरबीही वाढू लागते. ज्यामुळं मधुमेह, स्थुलता यांसारख्या समस्या भेडसावतात. 

हृदयाला धोका (heart health) - ब्रेडमध्ये असणाऱ्या सोडियममुळे उच्च रक्तदाबाचा त्रास सतावतो. त्याशिवाय रक्त धमन्यांमधून हृदयापर्यंत पोहोचण्यास विलंब लागतो.ज्यामुळं आर्टरी डिजीज, ट्रिपल वेस्ल डिडीज आणि इतर हृदयरोगांचा धोका बळावतो. 

(वरील माहितीच्या आधारे काही सवयींमध्ये बदल करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. )