तल्लख बुद्धिमत्तेसाठी कडीपत्ता उपयुक्त!

डाळी-आमटी, भाजीतील कडीपत्ता सगळ्यांच आवडतो असे नाही. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 15, 2017, 08:04 PM IST
तल्लख बुद्धिमत्तेसाठी कडीपत्ता उपयुक्त! title=

मुंबई : डाळी-आमटी, भाजीतील कडीपत्ता सगळ्यांच आवडतो असे नाही. काही लोक अगदी आमटी-भाजीतील कडीपत्ता शोधून खातात. तर काही तो दिसताच बाजूला काढतात. परंतु, कडीपत्ताचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. विशेषतः समरणशक्ती वाढण्यासाठी याचा फायदा होतो. 

कडीपत्त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आपल्याला माहित असतील. परंतु, कडीपत्त्यामध्ये बुद्धी वाढवण्याचे गुणधर्म असतात, हे अनेकांना माहित नाही. 

भाजी-आमटीतील कडीपत्ता आवडत नसेल तर तुम्ही कडीपत्त्याचा चहा देखील बनवू शकता. मग सकाळी चहा-कॉफी ऐवजी तुम्ही कडीपत्त्याचा चहा घेऊ शकता. त्याचा मेंदूला अधिक फायदा होईल. मग जाणून घेऊया कडीपत्त्याचा चहा कसा बनवायचा ते. 

साहित्य:

कडीपत्त्याची काही पाने
२ कप पाणी
छोटा गुळाचा खडा
चिमूटभर जिरं
छोटा आल्याचा तुकडा
चिमूटभर काळ मीठ

चहा बनवण्याची पद्धत:

१. तव्यावर जिरं भाजून त्याची बारीक पावडर करा.
२. एक भांड्यात २ कप पाणी घेऊन त्यात कडीपत्त्याची पाने  आणि आल्याचा तुकडा घालून उकळवा.
३. त्यात गुळाचा खडा घाला.
४. पाणी नीट उकळ्यानंतर गॅस बंद करा.
५. कपात ओता.
६. त्यात काळ मीठ घाला.
७. थोडी जिरं पावडर घाला.
८. आणि गरमागरम चहा घ्या.