Diwali Celebration : दिवाळींच्या फटाक्यांमुळे त्वचेचे, डोळ्यांचे नुकसान होऊ शकते, अशी काळजी घ्या

दिवाळीत फटाक्यांपासून त्वचेची आणि डोळ्यांची अशी काळजी घ्या

Updated: Oct 24, 2022, 09:43 PM IST
 Diwali Celebration : दिवाळींच्या फटाक्यांमुळे त्वचेचे, डोळ्यांचे नुकसान होऊ शकते, अशी काळजी घ्या title=

मुंबई : देशभरात दिवाळी (Diwali) सण उत्साहात साजरा होत आहे. या सणानिमित्त बच्चे कंपनीपासून लहान- मोठ्यापर्यंत सर्वंच फटाके फोडण्यात मग्न आहेत. हे फटाके फोडताना थोडी काळजी घेणेही गरजेचे आहे. जर ती न घेतल्यास तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं. तुमची त्वचा आणि डोळ्यांवर या फटाक्यांचा वाईट परीणाम होऊ शकतो. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊयात. 

अ‍ॅलर्जी

फटाक्यांच्या प्रदूषणामुळे (Fire crackers pollution) ऍलर्जी होते. त्वचेवर जळजळ, लाल पुरळ आणि पिंपल्स येऊ लागतात. काही लोकांची त्वचा खूप संवेदनशील असते, त्यामुळे त्यांना हे त्रास होतात. तसेच फटाक्यांचा धूर ही देखील अशीच एक संवेदनशील गोष्ट आहे. त्यात असलेले कार्बनचे कण हवेतील ऑक्सिजनची पातळी कमी करतात. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. 

डोळ्यांना इजा पोहोचतात

दिवाळीत (Diwali) लोक फटाक्यांबाबत बेफिकीर असतात. मोठ्या आवाजाचे फटाके फोडल्याने अनेकवेळा हाताची बोटाला दुखापत होते. फटाक्यांच्या मसाल्यामुळे डोळ्यात धूर येतो. त्यामुळे डोळे जळजळ होऊन लाल होतात. फटाक्यांमुळे झालेल्या दुखापतीमुळे डोळ्यांना जखमा होतात, रक्ताच्या गुठळ्या तयार होतात, काही वेळा बाहुलीलाही इजा होऊ शकते.

ही खबरदारी घ्या

फटाके पेटवताना (Fire crackers pollution) निष्काळजीपणा करू नका. लहान मुलांकडून फटाक्यांची आतषबाजी करण्यावर ज्येष्ठांनी लक्ष ठेवावे. लहान मुलांना कधीही मोठ्या आवाजाचे फटाके देऊ नका. फटाके नेहमी शरीरापासून दूर ठेवून ते जळवावेत. फटाक्यांच्या ठिकाणाहून अशा वस्तू काढून टाका, ज्यामध्ये थोडीशी ठिणगी पेटू शकते.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)