Fever at night : तुम्हालाही फक्त रात्री ताप येतो? कारणं ऐकून तुम्ही हादराल

चला तर मग जाणून घेऊया रात्री ताप येण्याची कारणे कोणती आहेत.

Updated: Oct 11, 2022, 03:04 PM IST
Fever at night : तुम्हालाही फक्त रात्री ताप येतो? कारणं ऐकून तुम्ही हादराल title=
Do you also get fever only at night You will be shocked to hear the reasons nz

Fever at night : ताप कधीही येऊ शकतो मात्र कारणं अनेक असू शकतात पण काही लोक असं म्हणतात की त्यांना रोज रात्री ताप येतो. हे रात्रीच्या तापमानात घट झाल्यामुळे असू शकते. याशिवाय अनेक कारणांमुळे तुम्हाला ताप (Fever) येऊ शकतो. काही लोक याकडे दुर्लक्ष करतात जे चुकीचे आहे. वेळीच उपचार (Treatment) न केल्यास तुम्हाला अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. चला तर मग जाणून घेऊया रात्री ताप येण्याची कारणे कोणती आहेत. (Do you also get fever only at night You will be shocked to hear the reasons nz)

Fever reason : रात्री ताप येण्याची कारणे कोणती

1. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा स्ट्रेस असल्यास त्याचा परिणाम तुमच्या रात्रीच्या झोपेवर होईल त्यामुळे साहजिकच तुमची झोप पूर्ण होणार नाही.त्यामुळे शरीरात थकवा जाणवेल. 

2. जर तुम्हाला घशात infection झालं असेल तर खोकल्याची समस्या असू शकते. आणि कफ (Cough) रात्री जास्त वाढतो, त्यामुळे तापही येतो.

3. त्वचेतील कोणत्याही प्रकारची ऍलर्जी (Allergies) देखील ताप येण्यास कारणीभूत ठरू शकते, अशा परिस्थितीत, आपण ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा घरगुती उपायांचा वापर करावा. 

4. बॅक्टेरियल इन्फेक्शन (Bacterial infection) हे देखील रात्री ताप येण्याचे कारण असू शकते. अशा स्थितीत निष्काळजीपणा करु नका, ताबडतोब डॉक्टरांना भेटा.

5. UTI infection मुळे तुम्हाला ताप देखील येऊ शकतो. तुम्हाला लघवी करताना जळजळ होण्यासारख्या समस्या असू शकतात. या सर्व लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, ताबडतोब डॉक्टरांना भेटा.

6. रात्री ताप येत असेल तर पूर्ण बाह्यांचे कपडे घालून झोपावे. याशिवाय रात्री थंड पदार्थ खाणे टाळावे. कूलर एसीमध्ये झोपू नका.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)