Weight Loss: वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय, चवीनं अंडी खा, सडपातळ व्हा!

Egg: हो, वजन कमी (weight loss) करण्यासाठी अंडी हा रामबाण उपाय आहे. 10 दिवस पोटाची चरबी गायब...

Updated: Oct 11, 2022, 12:50 PM IST
Weight Loss: वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय, चवीनं अंडी खा, सडपातळ व्हा! title=
egg for weight loss and belly fat loss nmp

Egg for Weight Loss: दिवाळी (Diwali 2022) अवघ्या काही दिवसांवर आली आहे. अनेकांना दिवाळी म्हटलं की वेध लागतात दिवाळी फराळाचे (Diwali snacks)...चिवडा (Pohe Chivda), चकली (Chakli), शंकरपाळे (shankarpali), रवा बेसन लाडू (Rava Besan Ladoo)...सुटलं ना तुमच्या तोंडाला पाणी...जर तुम्हाला दिवाळीमध्ये पोटभर फराळ खायचाय पण वजन वाढण्याची भीती वाटते. मग नो टेन्शन...दिवाळीत मनसोक्त फराळ खाण्यासाठी आजपासूनच डाएटमध्ये अंड्याचा समावेश करा. 

हो, वजन कमी (weight loss) करण्यासाठी अंडी हा रामबाण उपाय आहे. 10 दिवस पोटाची चरबी गायब...अहो आम्ही कुठल्या कंपनीची जाहिरात करत नाही आहोत. तर वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोक सकस आहार (diet), व्यायामशाळा (gym), योगासने (yoga) किंवा व्यायामाचा (exercise) अवलंब करतात. पण अनेक वेळा हे सगळं करूनही तुम्हाला हवा तसा परिणाम मिळत नाही. पण अंड्यांमध्ये असे अनेक गुणधर्म असतात जे तुम्हाला जलद वजन कमी करण्यास मदत करतात. (egg for weight loss and belly fat loss nmp)

चला तर मग जाणून घेऊयात वजन कमी करण्यासाठी आहारात अंड्यांचा समावेश कसा करायचा आहे.

अंडी आणि मिरपूड (Egg and black pepper)

जर तुम्ही अंड्यासोबत काळी मिरी वापरली तर वजन कमी करण्यात खूप मदत होते. यासाठी काळी मिरी पावडर टाकून उकडलेले अंडे किंवा ऑम्लेट खा. यामुळे तुमच्या कंबरेची चरबी झपाट्याने कमी होऊ लागते.

अंडी आणि खोबरेल तेल (Egg and coconut oil)

जर तुम्ही नारळाच्या तेलासह अंड्याचे सेवन केले तर ते वजन कमी करण्यास मदत करते. वास्तविक, खोबरेल तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण नगण्य असते. अशा परिस्थितीत खोबरेल तेलाच्या मदतीने तुम्ही ऑम्लेट बनवून खाऊ शकता. यामुळे तुमचे वजन सहज कमी होते.

अंडी आणि सिमला मिरची (Egg and capsicum)

जर तुम्हाला लवकर वजन कमी करायचे असेल तर तुम्ही अंडी आणि शिमला मिरची एकत्र मिसळून खा. यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ लागते. यासोबतच तुमच्या आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. तीचा अवलंब करण्यापूर्वी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)