'या' एका चूकीमुळे सोनाली बेंद्रे गंभीर कॅन्सरच्या विळख्यात ?

इरफान खान पाठोपाठ अभिनेत्री सोनाली बेंद्रेने सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कॅन्सरचा सामना करत असल्याची माहिती दिली आहे.

Updated: Jul 10, 2018, 04:29 PM IST
'या' एका चूकीमुळे सोनाली बेंद्रे गंभीर कॅन्सरच्या विळख्यात ? title=

मुंबई : इरफान खान पाठोपाठ अभिनेत्री सोनाली बेंद्रेने सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कॅन्सरचा सामना करत असल्याची माहिती दिली आहे. 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज' या रिएलिटी शोच्या परिक्षकाच्या भूमिकेत असलेली सोनाली आता उपचारांसाठी न्यूयॉर्कमध्ये आहे.  पहा कॅन्सरशी सामना करत असलेली सोनाली बेंद्रे सोशल मीडियावर काय म्हणाली

सोनाली बेंद्रेला कॅन्सर - 

सोनालीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या माहितीनुसार ती हाय ग्रेड कॅन्सरचा सामना करत आहे. इंटरनॅशनल बिझनेस टाईम्सने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, सोनालीला गेले अनेक दिवस अंगदुखीचा त्रास जाणवत होता. मात्र हा त्रास लहानसा आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले. यामधूनच सोनालीचा कॅन्सर अंतिम टप्प्यात पोहचल्यानंतर त्याचे निदान झाले आहे. कॅन्सरशी सामना करणार्‍या सोनाली बेंद्रेचा नवा लूक व्हायरल

न्यूयॉर्कमध्ये उपचार -  

सोनाली बेंद्रेचा कॅन्सर Metastatic Cancer आहे. म्हणजेच तो एका अवयवातून शरीरात झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे वेळीच त्याची वाढ रोखण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत आहेत. सोनालीच्या चाहत्यांसोबतच बॉलिवूड कलाकारही सोनालीच्या पाठीशी उभे आहेत. जगभरातून सोनाली या आजारावर मात करून लवकर बाहेर पडावी याकरिता प्रार्थना केली जात आहे.शरीराची ही ८ लक्षणे देतात कॅन्सराचा इशारा!