Fact Chek : तुम्ही उभं राहून औषध घेत असाल तर सावधान, आरोग्यास ठरू शकतं घातक?

उभं राहून औषध घेत असाल तर तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो? औषधं घेण्याची योग्य पद्धत कोणती? काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य

Updated: Dec 12, 2022, 06:11 PM IST
Fact Chek : तुम्ही उभं राहून औषध घेत असाल तर सावधान, आरोग्यास ठरू शकतं घातक? title=

Fact Chek : आपण आजारी पडलो किंवा काही दुखापत झाली तर आपण डॉक्टरकडे जातो. योग्य निदान झाल्यानंतर डॉक्टर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची औषधं (Medicines) देतात. साधारण दिवसातून तीनवेळा म्हणजे सकाळी नाश्त्यानंतर, दुपारी आणि रात्री जेवल्यानंतर गोळ्या खाण्याचा सल्ला डॉक्टर (Doctor) देतात. त्याप्रमाणे आपण औषधांचे डोस घेत असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, औषधं खाण्याची योग्य पद्धत कोणती आहे. 

औषधं घेण्याची योग्य पद्धत कोणती?
उभ्याने किंवा बसून औषधं खात असाल तर ते आरोग्यासाठी आणखी घातक ठरू शकतं असा दावा करण्यात आला आहे. एका स्टडीजमध्ये हा दावा करण्यात आला आहे. बसून औषधं घेतल्याने त्याचे परिणाम लगेच होत नाही आणि पुन्हा पुन्हा आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं असा दावा या अभ्यासात करण्यात आला आहे. व्हायरल मेसेजमध्ये (Viral Message) काय म्हटलंय पाहुयात...

काय आहे व्हायरल मेसेज?
बसून किंवा उभ्यानं औषधं खाण्यापेक्षा झोपून औषधं खाणं चांगलं. याचा फायदा आरोग्यास होऊ शकतो. झोपून औषध खाल्ल्यानं त्याचा चांगला परिणाम लगेच दिसून येतो असा दावा फिजिक्स ऑफ ल्यूईडच्या अभ्यासातून करण्यात आलाय. हा मेसेज व्हायरल झाल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली. खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? याबाबत अधिक माहिती एक्सपर्ट देऊ शकतात. त्यामुळे आम्ही याची माहिती घेतली. 

हे ही वाचा : Single Cigarette Ban: धुम्रपान करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'Single' सिगरेट विक्रीवर येणार बंदी?

व्हायरल होणाऱ्या मेसेजची पोलखोल
आम्ही केलेल्या पडताळणीत व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये काहीही तथ्य नसल्याचं समोर आलं आहे. झोपून गोळ्या खाल्यानं त्रास होऊ शकतो, बसून किंवा उभ्यानं औषध घेणं घातक नाही, यातही बसून गोळ्या खाणं कधीही चांगलं असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. डॉक्टर औषध देण्याबरोबरच ती कशी आणि कुठे स्टोअर करावीत याचाही सल्ला देतात. प्रत्येक औषधं ही फ्रीजमध्ये ठेवली जाणारी नसतात. काही औषधं घरात बाहेर ठेवली जातात. तसंच डॉक्टरांनी जितक्या दिवसांच्या औषधांचा कोर्स दिला आहे, तो पूर्ण करणं गरजेचं आहे.

हे ही वाचा : देशात पुन्हा एकदा नोटबंदी? 2 हजारांची नोट बंद होणार?

व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नका
व्हायरल मेसेज करून लोकांना घाबरवण्याचं काम केलं जातं आहे. असे मेसेज पाहून लोकांच्या मनात भीती निर्माण होते. पण, घाबरण्याची आवश्यकता नाही. व्हायरल मेसेजची आम्ही सत्यता पडताळून सांगत असतो. आमच्या पडताळणीत बसून, उभ्याने गोळ्या खाल्ल्याने आरोग्यास घातक असल्याचा दावा असत्य ठरला.