पंचवीशीनंतर मुलींच्या शरीरात 'हे' बदल होतात!

 माणसाचे वय जसंजसे वाढू लागते तसतसा त्याचा शारीरिक आणि मानसिक विकास होऊ लागतो.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 5, 2018, 04:23 PM IST
पंचवीशीनंतर मुलींच्या शरीरात 'हे' बदल होतात! title=

मुंबई : माणसाचे वय जसजसे वाढू लागते तसतसा त्याचा शारीरिक आणि मानसिक विकास होऊ लागतो. मात्र वाढत्या वयासोबत आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी बदलतात, तणाव वाढतो. त्यामुळे शारीरिक क्रिया, ऊर्जा यात बदल होऊ लागतात. तर जाणून घेऊया वयाच्या २५ शी नंतर मुलींच्या शरीरात नेमके काय काय बदल होतात...

ऊर्जेची कमी

पूर्वी भरपूर एनर्जी असलेल्या मुलींमध्ये २५ शी नंतर एनर्जी कमी होऊ लागते. वय वाढीमुळे शरीरात होणारा हा बदल अत्यंत स्वाभाविक आहे. इतकंच नाही तर वर्कआऊटनंतर स्नायू दुखू लागतात आणि रिकव्हर होण्यासही  वेळ लागतो. 

मेटॉबॉलिझम कमी होते

एक वेळ अशी असते की आपण लाडू, मिठाई, गोड पदार्थ मनसोक्त खातो. पण शरीराची रचना, एनर्जी लेव्हल किंवा मूड यात काहीही फरक जाणवत नाही. मात्र २५ शी नंतर मेटॉबॉलिझम स्लो होऊ लागतं आणि त्यामुळे वजन कमी करणँ कठीण होतं. तसंच त्यासाठी अधिक व्यायाम किंवा फिजिकल अॅक्टिव्हिटीची गरज भासते. 

केसगळती

तुम्ही ही कदाचित हे नोटीस केलं असेल की, २५ शी नंतर केसगळतीचे प्रमाण वाढते. केस विंचरल्यावर कंगव्यात अधिक केस दिसून येतात. याचे कारण तणाव किंवा हार्मोनल इन्मबॅल्नस हे आहे. यासाठी उत्तम उपाय म्हणजे नियमित व्यायाम करणे आणि तणावरहीत राहणे.

सुरकुत्या, फाईन लाईन्स

वय वाढू लागल्यावर त्वचेच्या समस्या उद्भवू लागतात. त्याचबरोबर युव्ही किरणांमुळे त्वचेचे होणारे नुकसान आलेच. तसंच धावपळीची आणि गुतांगुंतीची जीवनशैली यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवतात. त्वचा कोरडी होऊ लागते.