मुंबई : मका तसा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ. भाजलेलं मक्याचे कणीस, उकडलेला मका हे आपण आवडीने खातो. मका अत्यंत पौष्टीक असून त्यात फायबर्स अधिक प्रमाणात असतात. जाणून घेऊया मक्याचे फायदे...
मक्यामुळे शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी होतात. मक्यात असलेल्या बायोफ्लेवोनॉयड्स, कॅरोटेनॉयइस, विटॉमिन्स आणि फायबर्स असतात. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी मका फायदेशीर ठरतो.
मक्यात मॅग्नेशियम आणि आर्यन असते. त्यामुळे हाडांना बळकटी येते. याव्यतिरिक्त मक्यात झिंक आणि फॉस्फरस असते. त्यामुळे हाडासंबंधित रोग दूर होण्यास मदत होते. आर्थराइटिस आणि ऑस्टियोपोरोसिस यापासून संरक्षण होते.
मक्यात कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. जर तुम्हाला दमल्यासारखे वाटत असेल तर किंवा काम करताना आळस येत असेल तर आहारात मक्याचा समावेश करा. त्यामुळे पोट लवकर भरते आणि उत्साह टिकून राहतो.
मका तुमच्या डोळ्यांसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. कारण त्यात व्हिटॉमिन ए आणि बीटा कॅरेटीन असते. त्यामुळे तुमची दृष्टी सुधारते.
अॅसिडीटी, बद्धकोष्ठता यांसारख्या पोटाच्या समस्या दूर होण्यास फायदा होतो. मक्यात फायबर असते त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.