उन्हाळ्यात हाता-पायाच्या तळव्यांची जळजळ होते, 'हे' घरगुती उपाय करुन पाहा!

Burning Sensation In The Soles Of The Feet: पायाच्या तळव्यांना सतत जळजळ होते. काळजी करु नका ही घरगुती उपायांनी तुमची ही समस्या कायमची मिटेल 

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 1, 2024, 04:56 PM IST
उन्हाळ्यात हाता-पायाच्या तळव्यांची जळजळ होते, 'हे' घरगुती उपाय करुन पाहा! title=
health tips in marathi Burning Sensation In The Soles Of The Feet Home Remedies

Burning Sensation In The Soles Of The Feet: उन्हाळ्यात अनेकदा पायाच्या तळव्यांना जळजळ होण्याची समस्या होते. ही समस्या खासकरुन मधुमेहाच्या रुग्णांना किंवा महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान होते. अमेकांना पोटात उष्णता झाल्यामुळं किंवा जास्तप्रमाणात औषधे घेतल्यानंतरही होतात. तुम्हालादेखील हाताच्या व पायाच्या तळव्यांना जळजळ होत असेल तर काही घरगुती उपयांनी त्यावर मात करु शकता. हाता-पायाच्या तळव्यांना जास्तच जळजळ होत असेल तर हे उपाय वापरुन पाहा. 

हाता-पायाच्या तळव्यांची जळजळ होत असेल तर त्यावर कोरफडीचा गर हा सर्वोत्तम उपाय मानला गेला आहे. कोरफड ही थंड आहे त्यात आढळणारे अँटीइंफ्लेमेटरी गुण तळव्यांची जळजळ शांत करते. त्याचबरोबर अँटीबॅक्टीरियल आणि अँटीफंगल गुण पायांसंबंधी तक्रारी निवारण्यास मदत करते. त्याचबरोबर त्वचेसंबंधीत काही विकारही ठीक करते. त्याचबरोबर कोरफडीमध्ये हायड्रेटिंग गुण, त्वचेची जळजळ थांबवतात. त्याचबरोबर त्वचा वारंवार कोरडी पडते या समस्येवरही मात करतात. 

2 मिनिटे तळव्यांवर लावा कोरफडीचा गर

पायाच्या तळव्यांची जर जळजळ होत असेल तर सर्वात पहिले तळवे नीट साफ करुन त्यावर कोरफडीचा गर आणि लिंबू मिक्स करुन 2 मिनिटांपर्यंत लावा. यामुळं थोड्याच वेळात पायाची जळजळ थांबेल. हवं असल्यास रात्रभरही तुम्ही पायावर हे मिश्रण लावून ठेवू शकता. यामुळं पायाची जळजळ शांत होईल. 

कोरफड आणि चंदनाचा लेप 

पायाच्या तळव्याची अधिक जळजळ होत असेल तर कोरफड आणि चंदनाचा लेपदेखील लावू शकता. दोन्हीचे गुणधर्म थंड असतात. कोरफड आणि चंदन यांचा लेप बनवून तुम्ही पायाला काही वेळासाठी लावून ठेवू शकता. त्यानंतर थंड पाण्याने पाया धुवून घ्या. रोज जर तुम्ही हा लेप लावला तर पायाची जळजळ एकदम गायब होऊन जाईल. 

पायाच्या तळव्यांची जळजळ थांबवण्यासाठी काही घरगुती उपाय

- पाय काही काळासाठी बर्फाच्या पाण्यात बुडवून ठेवा

- अॅपल व्हिनेगरचा वापर करा

- आल्याच्या तेलाने पायाला मॉलिश केल्यास खूप आराम पडेल

- कोरफडीचा गर आणि नारळाचे तेल यांच्या मिश्रणात कापूर टाकून हा लेप पायाच्या तळव्यांना लावा

सतत पायाच्या तळव्यांना जळजळ होत असेल तर...

जर पायाच्या तळव्यांना सतत जळजळ होत असेल तर दुर्लक्ष करु नका. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळंदेखील पायाची जळजळ होऊ शकते. व्हिटॅमिन बी 12च्या कमतरतेमुळंदेखील पायाच्या नसा कमकुवत होतात. अशावेळी तळव्यांमध्ये जळजळ, उभं राहण्यास वेदना, पायांत वेदना, नसाच्या आसपास खाज येणे यासारखी प्रमुख लक्षणे दिसतात. 

व्हिटॅमिन बी 12 कमी असल्यास काय करावे

व्हिटॅमिन बी 12ची कमतरता असल्यात आहारात दूध, दूधापासून बनवलेले पदार्थ, बदाम, सफरचंद, केळ, स्प्राउट्स, टॉमेटो, अंड, मासे इत्यादी पदार्थ समाविष्ट करा. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)